तुळशीला अर्पण करा ‘ही’ एक वस्तू : लक्ष्मी इच्छेला पावेल, अतिशय धनवान बनाल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्याकडे भरपूर पैसा असावा भरपूर धन असावे. भरपूर संपत्ती असावी. आपले जीवन सर्व सुख सोयींनीयुक्त असावे असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी आपण खूप कष्ट करतो. परंतु कष्टाच्या मानाने जर आपल्याला उत्पन्न मिळत नसेल तर आपला हिरमोड होतो.

या सर्वासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो त्यात काही अंशी फरक पडतोही नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या तशी परिस्थिती निर्माण होते. आपण संकटात असतो त्यावेळी आपल्याला देव आठवतो म्हणजे आपण आर्थिक अडचणीत त्यावेळी त्यावर उपाय करतो.

त्यात थोडासा बदल झाला, आपल्या हातात पैसा खेळू लागला की आपण उपाय थांबवतो. पण हे चुकीचे आहे. एकदा जर नियम केला तर तो नित्यनेमाने केला पाहिजे. तेव्हा त्याचा खरा उपयोग होतो.

आज आपण पाहणार आहोत गुरुवारी करण्याचे काही उपाय. यांच्यामुळे आपल्याला चारही दिशेने सफलता मिळेल. गुरुवार हा आठवड्यातील पाचवा दिवस. गुरुवारी श्री विष्णूचे आणि गुरूंचे पूजन केल्याने आपल्याला लाभ होतात. गुरुवार हा देवी लक्ष्मीचा वार असल्याने या दिवशी केलेले उपाय खूपच लाभदायक होतात.

जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल पैसे येतात पण घरात टिकत नाहीत या त्रासापासून तुम्हाला कायमची सुटका करून घ्यायची असेल तर खाली दिलेले छोटे छोटे परंतु परंतु प्रभावी उपाय करून तुम्ही या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.

या उपायांची सुरुवात तुम्ही कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून करू शकता. गुरुवारी सकाळी स्नान झाल्यानंतर न तापवलेले कच्चे दूध दोन-तीन चमचे तुळशीला अर्पण करावे.

यामुळे तुमच्या आर्थिक समस्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होईल. गुरुवार हा देवी लक्ष्मीचा आणि श्रीविष्णूचा आवडता वार आहे व त्यांचा आवडता रंग पिवळा आहे. म्हणून गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला सफलता मिळेल. पिवळे कपडे परिधान करणे शक्य नसेल तर पिवळा रुमाल तरी बरोबर ठेवावा.

गुरुवारी कोणत्याही महत्त्वाचा कामानिमित्त बाहेर पडायचे असल्यास पिवळ्या रंगाची मिठाई आणून तिचा नैवेद्य लक्ष्मी आणि श्रीहरीना दाखवावा व प्रसाद खाऊन मग घराबाहेर पडावे. ते काम नक्कीच यशस्वी होते.

शक्य असेल तर दर गुरुवारी मंदिरात जावे आणि त्यांचे दर्शन घ्यावे. श्रीहरीना गुरुवारी पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करावीत.

श्रीहरी विष्णूंचे मंदिर आसपास नसेल तर इतर कोणत्याही देवी-देवतांच्या मंदिरात फुले अर्पण करावीत. आपले काम करता करता मनातल्या मनात

ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः

या मंत्राचा जप करीत राहावे. म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यात भगवंत आपल्याबरोबर असतील. आपल्याला धनाची अपेक्षा असते आणि धनाची देवी माता लक्ष्मी आहे. श्रीहरी विष्णूचे पूजन केले तर ते आपल्या सोबत असतील. जेथे श्रीहरी विष्णू असतील तेथे माता लक्ष्मी असणारच.

मित्रांनो हे छोटे-छोटे उपाय करून आपल्या घरी धनाचा वर्षाव करा. तुम्ही ही माहिती तुमचे मित्र मैत्रीण आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज ला लाईक करा.

वरील उपाय हे वेगवेगळ्या स्रोतांचा आधारे आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published.