नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींनो आपल्याला जर आपले भाग्य बदलायचे असेल तर गुरूवारच्या दिवशी हे पाच उपाय केल्याने याचे भरपूर फायदे आपल्याला होतील. जर आपल्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रहांशी निगडीत कोणतेही दोष असतील आणि हे दोष दूर करण्यासाठी गुरूवारच्या दिवशी विशेष उपाय केले जातात. हे उपाय केल्याने आपल्या पत्रिकेतील गुरु ग्रहाचा दोष कमी होतो. बृहस्पति देवांचे पण गुरु आहेत. गुरु हा ग्रह आपले वैवाहिक जीवन त्याच बरोबर भाग्योदय करणारे कारक गुरु आहेत ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु ग्रहाचा त्रास आहे. त्यांचे वैवाहिक जीवन खडतर जाते. त्यामुळे आपल्या पत्रिकेतील गुरु ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी गुरूवारच्या दिवशी हा उपाय करावा.आजच्या लेखामध्ये आपण गुरु ग्रहाचे दोष दूर करणारे पाच उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्याने आपल्या पत्रिकेतील गुरू ग्रहाचे दोष नाहीसे होतात.
1) पहिला उपाय- गुरूवारच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. हे प्रवास करत असताना मीठ घातलेला कोणताही पदार्थ खायचा नाही. म्हणजेच काय तर बिन मिठाचे आळणी पदार्थ आपल्याला खायचे आहेत त्याच बरोबर या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र देखील परिधान करावी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्या जेवणामध्ये पिवळ्या रंगांच्या आहार घ्यावा त्यामध्ये आपण बेसनचे लाडू ,आंबे, केळी इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतो. म्हणजेच काय तर गुरुवार चा उपवास आपण ज्या दिवशी करणार आहोत. त्या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे व पिवळेच पदार्थ आपल्याला खायचे आहेत.
2) दुसरा उपाय- बृहस्पतीच्या प्रतिमेची स्थापना पिवळ्या वस्त्रावर करावी. यांची स्थापना करून झाल्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांची पूजा करावी यामध्ये केसरी चंदन व पिवळे फुल, पिवळे तांदूळ त्याच बरोबर प्रसादासाठी पिवळा पदार्थ घ्यायचा आहे. किंवा त्यांना अर्पण करावीत हा उपाय केल्याने देखील आपल्या पत्रिकेत असलेला गुरु दोष कमी होतो. बृहस्पतिची प्रतिमा आपल्याला ऑनलाईन मिळू शकते किंवा जवळच्या स्वामी केंद्रांमध्ये किंवा पूजेची सामग्री ज्या दुकानांमध्ये मिळते. त्या दुकानांमध्ये आपल्याला बृहस्पतीची प्रतिमा सहज उपलब्ध होऊ शकते.
3) तिसरा उपाय- गुरूवारच्या दिवशी गुरूंचा जप करावा. हा जप केल्याने आपल्यावर आपल्या गुरूंची कृपा राहील. हा गुरुमंत्र असा आहे. ‘ओम बृं बृहस्पते नमः’ हा मंत्र जप करत असताना या मंत्राची संख्या कमीत कमी 108 म्हणजेच पूर्ण एक माळ तरी करायचे आहे. यामुळे देखील आपल्यावर गुरूंचा आशीर्वाद राहील. येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून आपल्याला ते बाहेर काढतील. व आपल्या पत्रिकेमध्ये असणारा दोस्ती केली याने कमी होईल. आणि आपले भाग्य देखील याने बदलेल.
4)चौथा उपाय – गुरु ग्रहाची निगडित असलेल्या पिवळ्या वस्तू दान कराव्यात सोने, हळद, (हरभरा) चण्याची डाळ, आंबा, केळी अशा पिवळ्या रंगांच्या वस्तू दान कराव्यात. अशा प्रकारे जर आपण पिवळ्या वस्तूंचे दान जर केले तर आपले भाग्य बदलेल व गुरु ग्रहाचा दोष निघून हा उपाय देखील आपल्याला गुरूवारच्या दिवशी करायचा आहे. हा पाच उपायांपैकी खूप जलद परिणाम करून देणारा उपाय आहे. त्यामुळे आपले भाग्य उजळेल व गुरू ग्रहाचा दोष कमी होईल.
5) पाचवा उपाय- गुरूवारच्या दिवशी महादेवांना बेसनाच्या लाडूंचा प्रसाद अर्पण करावा. यामुळे देखील आपला गुरु दोष कमी होतो व महादेवांचा आशीर्वाद आपल्याला लागतो. हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे. वरील सांगितल्याप्रमाणे हे पाच उपाय आपण जर केले तर विवाह संदर्भात असलेल्या अडचणी व भाग्योदय होण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होतील. मित्रांनो हे पाच उपाय आपल्याला करणे शक्य नसतील तर यातील आपण एखाद दुसरा उपाय देखील करू शकतो आणि ज्यांना शक्य आहे. त्यांनी हे पाचवी उपाय करावेत. हे उपाय केल्याने गुरु ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये नक्की प्रसन्न राहतात आणि आपल्यावर कसल्याही प्रकारच्या आणि अडचणी येत नाहीत व आपले भाग्यदय होते.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.