नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो यावर्षीची होळी 17 मार्च रोजी साजरी होणार आहे. होळीची रात्र तसे देखील पूजा आणि ज्योतिषाचे उपाय करण्यासाठी फारच शुभ मानली जाते. या दिवशी तुम्ही काही उपाय करून आपले भाग्य चमकवू शकता. ज्योतिषांप्रमाणे या रात्री साधना केल्याने लवकरच त्याचे शुभ फळ मिळतात. आरोग्य धनसंपदा लाभते.
जाणून घेऊया या दिवशी करावयाचे वेगवेगळे उपाय..
आरोग्यासाठी – मित्रांनो, आरोग्यात सुधारण्यासाठी होळिका दहनानंतर त्याची उरलेली राख आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवावी. हा उपाय केल्याने जुन्याहून जुना आजार बरा होण्यास मदत मिळते.
धन वाचवण्यासाठी – मित्रांनो, जर पैशांची बचत होत नसेल तर होळिका दहनच्या दुसर्या दिवशी होळीची राख एखाद्या लाल रुमालात बांधून घ्या आणि त्याला आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा.
नोकरी किंवा व्यवसायासाठी – मित्रांनो, नोकरी किंवा व्यापारात अडचण येत असल्यास होळिका दहनानंतर 1 जटा असणारे नारळ मंदिर किंवा होळिका दहन असणार्या जागेवर ठेवावे.
वाईट दृष्टीपासून बचावासाठी – मित्रांनो,होळी जाळल्यानंतर दुसर्या दिवशी ती राख पुरुषांनी तिलक म्हणून लावावी तसेच स्त्रियांनी ही राख आपल्या मानेवर लावावी. हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या वाईट दृष्टीपासून बचाव होऊ शकतो.
धन लाभासाठी – मित्रांनो,होळी दहनाच्या वेळेस कुटुंबातील सर्व सदस्यांना होळिकेच्या तीन किंवा सात प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. प्रदक्षिणा घालताना होळीत चणे, मटार, गहू, अळशी टाकायला पाहिजे. असे केल्याने आरोग्य उत्तम राहतं आणि धनलाभाचे ही योग बनतात.
वरील माहिती ही वेगवेगळ्या आधारे एकत्रित करण्यात आलेले आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या पेजला सातत्याने भेट द्या. आणि शेअर करायला विसरू नका.