नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो होळी हा आपल्याकडील एक महत्त्वाचा सण आहे. होळीला धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक जेवढे महत्त्व आहे, तेवढेच शास्त्रीय दृष्ट्याही सणाचे महत्त्व वेगळे आहे आणि आपल्या महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात. या दहनावेळी नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि खोबरं यात दहन केलं जातं. तसेच होळी भोवती प्रदक्षीणा घातली जाते आणि त्याचबरोबर काही ठिकाणी होळी रे होळी पुरणाची पोळी असं देखील म्हटलं जातं. नैवेद्य म्हणून टाकलेलं खोबरं प्रसाद म्हणून खाल्ला जातो.
परंतु मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये होळी पेटवण्यात संबंधित सविस्तरपणे माहिती दिली गेली आहे आणि त्याबद्दलच आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत, आणि मित्रांनो आपल्या शास्त्रनुसार होळी पेटवण्याची योग्य वेळ ही संध्याकाळची आहे कारण आपले शास्त्र असे सांगते की,फाल्गुन पौर्णिमेला भद्रा नक्षत्र संपल्यानंतर होळी पेटवावी. मात्र दिवसा कधीही होळी पेटवू नये. होळी शक्यतो गावामध्ये किंवा गावाबाहेर सार्वजनिक स्वरूपात पेटवण्याची प्रथा आहे.
आणि त्याच बरोबर आपल्या शास्त्रानुसार ज्या ठिकाणी होळी पेटवायची असेल, ती जागा सकाळीच केर काढून पाणी शिंपडून स्वच्छ करून घ्यावी. नंतर त्या जागी झाडाच्या वाळलेल्य फांद्या, काटक्या, गोवऱ्या ह्यांची ढीग रचून ठेवावा. मध्ये एक फांदी उभी करावी. जो होळीची पूजा करून ती पेटवणार आहे, त्याने संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुचिर्भूत व्हावे. होळीच्या पूजेचा मान ज्येष्ठ किंवा सन्माननीय व्यक्तीला दिला जातो.
पूजा करणाऱ्या व्यक्तीने देश, कालाचा उच्चार करून ‘ढुंढा राक्षसीकडून होणाऱ्या पीडांच्या परिहारार्थ या होलिकेचे पूजन मी करत आहे’ असा जमलेल्या सर्वांच्या वतीने संकल्प करावा. नंतर होळीची षोडशोपचारे पूजा करावी. तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. नंतर ती होळी पेटवावी. काही ठिकाणी होळी पेटवण्यापूर्वी पूजा करतात, तर काही ठिकाणी पेटवून झाल्यानंतर करतात. परंतु होळी प्रदिप्त करण्यापूर्वी पूजा करणे सुरक्षेच्या दृष्टीने उचित ठरते.
होळी पेटवल्यानतर तिला सर्वांनी तीन प्रदक्षिणा घालून मुलांच्या रक्षणार्थ तिची प्रार्थना करून अर्घ्य द्यावे. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि त्याचबरोबर होळीला श्रीफळ वहावे. आणि त्याचबरोबर मित्रांनो होळीच्या दिवशी एकमेकांबद्दलचा राग, मत्सर, द्वेष तसेच वाईट गोष्टींची या होळीत आहुती दिली जाते आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते आणि हा धूलिवंदनाचा सण मुळात चार दिवस साजरा करण्याची प्रथा आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.