नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेबद्दल सांगणार आहे. अनेक लोकांना प्रश्न पडतो की महाराजांची सेवा कशी करावी आणि रोज नित्य नियमांचा चुकत असेल तर काय करावे. आपल्या स्त्रियांना घरची कामे भरपूर असतात. सकाळ सकाळी खूप कामे आहे कामात गडबड होत असते.
त्यामुळे आपल्याला असे वाटते की महाराज आपल्यावर नाराज तर होणार नाहीत ना. महाराज आपल्या आई वडिलांसारखे आहेत. आपले आई-वडील आपल्या मुलांवर नाराज होत नाहीत थोडावेळ नाराज होतात पण लगेचच तो नाराज दूर होतो त्याचप्रमाणे महाराजांची आपल्यावर कृपा असते पण त्याच्यासाठी आपण सेवा करत राहिली पाहिजे.
कधी पण आपल्या कडून चुका झाल्या असतील आधी आपल्या देव्हाऱ्यासमोर जा आणि देवासमोर माफी मागा. कधी पण आपल्या देवा देवा समोर कुलदेवता समोर म्हणा के आजचा पण दिवस आमच्यासाठी अशीच एक किरण घेऊन आला आहे खूप खूप धन्यवाद की आम्ही ही सृष्टी पाहत आहोत. त्यानंतर आपल्या कुलदेवतांचे नाव घ्या पितृ चे नाव घ्या नंतर श्री स्वामी समर्थांचे हे बीज मंत्र म्हणणे सुरु करा.
देव तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की तीनच अध्याय का वाचले असे वगैरे. महाराजांची नित्यसेवा हे तुम्ही दिवसभरात किंवा सायंकाळी दिवे लावायच्या वेळेस म्हणू शकता. सेवा करताना काही मंत्रजप आहेत तर गुरुचरित्र पारायण आहे जे तुम्ही ते वाचू शकता. इतकंच लक्षात ठेवा की दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही म्हणायचे नाही कारण भगवान दत्तगुरु हे ब्रम्हांतिवर निघतात.
आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की सकाळी ब्राह्मण मुहूर्तावर केलेली पूजा ही नेहमी आपल्या मन देवाशी एक तार जोडत असतो. जर तुम्ही सकाळी ब्राह्मण मुहूर्ताच्या वेळेस पूजा अर्चना जे काही असेल ते केलात तर तुम्हाला चांगलं मिळतं. पण काही लोकांना सकाळी कामामुळे खूप धावपळ होत असते गडबड होत असते. त्या लोकांनी जरी दिवसभरात श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केला तरी चालेल.
तुम्ही मोबाईलवर देखील ऐकला तरी काही हरकत नाही. फक्त कर्म चांगले ठेवा. आपण सकाळी सकाळी पूजा करीत असताना आपल्या कुलदैवताचे व पितृचे आपल्याला स्मरण झाल पाहिजे. ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल जीवनातील अडचणी समस्या दूर होते. आपल्या घरी देवतांचा वास राहतो महाराजांना ईतकच म्हणाला की मला कामामुळे काही सेवा होत नसतील तरी माझ्या तोंडून तुमचे नाव नक्की होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.