स्वतःचे घर होण्यासाठी करा ‘हे’ उपाय काही दिवसातच तुमचं घराच स्वप्न पूर्ण झालेले दिसेल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या संपूर्ण जीवनात आपल्या स्वतःच्या मालकीचा किमान एक तरी घर असाव किंवा बांधाव किंवा ते आपण विकत घ्यावं अशी मनोमन इच्छा प्रत्येकालाच असते. मित्रांनो तर तुमच्याही जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या असतील म्हणजेच पहिली गोष्ट तुम्ही घर बांधण्यासाठी एखादी जागा एखादा प्लॉट शोधताय मात्र तो प्लॉट काही मिळत नाहीये.

योग्य असा प्लॉट योग्य दरात मिळत नाहीये प्लॉट घेण्यामध्ये जमिनी विकत घेण्या मध्ये अनेक समस्या येत आहेत किंवा घर तुम्ही कोण विकत घेतलेला आहे.मात्र त्या ठिकाणी आता घराचं बांधकाम कच्चं आहे घराच्या बांधकामात मुहूर्तच मिळत आहे थोडक्यात आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आपली नवीन वास्तू उभी राहण्यासाठी मित्रांनो काही छोटे-छोटे उपाय आपल्याला करता येतात.

आजच्या लेखामध्ये अगदी साधे साधे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. यातील एखादा उपाय केला तरी आपणालाही निश्चित असे यश मिळेल.मित्रांनो नवीन वास्तूसाठी म्हणजेच नवीन घरासाठी पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे दररोज श्री गजानन जय गजानन या महामंत्राचा जप करणे.

ज्यांना शक्य असेल कमीत कमी दिवसातून 108 वेळा या मंत्राचा जप करा आणि या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ चुकूनही वापरून आपण इतर कोणतीही माळ शकता. मात्र तुळशीची माळ या ठिकाणी वर्ज आहे.
श्री गजानन जय गजानन या मंत्राचा जप करायचा आहे.

जर तुमच्याकडे वेळ नसेल तर काळजी करू नका तुम्ही चालता-बोलता अगदी कुठेही असताना या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा. तुम्ही बसमधून प्रवास करताना किंवा जर तुम्ही चालण्यासाठी फिरण्यासाठी जाते किंवा कुठेही बागेमधे बसल्या बसल्या, चालता-चालता श्री गजानन जय गजानन या महामंत्राचा जप करत चला.

दुसरा उपाय:
थोडसं अवघड उपाय आहे. एकवीस संकष्ट्या कराव्यात. 21 संकष्टी करा किंवा ज्यांना शक्य नाहीये 21 संतुष्टी करणे म्हणजे कालावधी खूप वाढतो. अशा लोकांनी 21 मंगळवार उपवास करावा. 21 मंगळवार एक वेळ जेऊन उपवास करा. हे उपवास आपण गणपतींच्या नावे करायचे आहेत.

मित्रांनो जर तुम्ही 21 मंगळवारचा एकभुक्त उपवास धरणार असाल म्हणजे केवळ एक वेळ जेवण करून उपवास करणार असाल तर मंगळवारी गणपतीबाप्पांना एक जास्वंदाचं फूल पहिल्या मंगळवारी एक जास्वंदाचं फूल दुसऱ्या मंगळवारी दोन जास्वंदाची फुलं तिसऱ्या मंगळवारी तीन असं करत करत 21व्या मंगळवारी 21 जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत.

फुलांसोबत आपण 21 दुर्वा सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत.
तिसरा उपाय:
सोबतच अजून एक छोटासा सांगतो गणपती अथर्वशीर्ष. गणपती अथर्वशीर्षाचा दररोज पठन करा. जास्त वेळ नाही पाच ते दहा मिनिटात हा पाठ होऊन जातो.

मित्रांनो तुम्ही तुमचं घर होत नाहीये म्हणून रात्रंदिवस विचार करता, काहीजण डिप्रेशनमध्ये जातात, मोठ्या प्रमाणात नकारात्मक विचार मनामध्ये येतात, एका भाड्याच्या घरामध्ये किती दिवस राहावं अशा प्रकारच्या विचाराने मन खिन्न होतं.

मित्रांनो तुम्ही विचार करण्यात इतका वेळ घालवता त्यापेक्षा कितीतरी कमी वेळेत जर आपण गणपती अथर्वशीर्षाचे पठण करण्यामध्ये घालवला तर लक्षात ठेवा तुमचं घर हे काही दिवसातच पूर्ण होईल.

मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल, तर तुमचं नशीब बलवत्तर असेल किंवा गणपती बाप्पाच्या कृपेने जर काही दिवसातच, काही महिन्यातच जर तुम्हाला तुमचं घराच स्वप्न पूर्ण झालेलं दिसलं.

तुमचे घर जरी पूर्ण झालं तरी उपाय सुरु केलेला आहे त्या उपायांमध्ये खंड पाडू नका. विनंती आहे. स्वतःहून 21 संकष्टी किंवा एकवीस मंगळवार यांचा संकल्प केला होता तो तुम्ही पूर्ण करा.

मित्रांनो कशी वाटली ही माहिती जरूर कमेंट करून सांगा आणि आमच्या पेज ला वारंवार भेट देत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *