होळी येण्यापूर्वी गुपचूप घरामध्ये आणा ‘ही’ एक वस्तू : माता लक्ष्मी प्रसन्न होईल, आर्थिक अडचणी सुटतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सणांची काही कमतरताच नाही. हे सण जितके उत्साही, आनंदी आहेत तितकेच अर्थपूर्ण सुद्धा आहेत. शेवटचा मराठी महिना म्हणजे फाल्गुन आणि या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ती फाल्गुन पौर्णिमा म्हणून संबोधले जाते. पोर्णिमेला होळीची पौर्णिमा सुद्धा असे म्हणतात. वाईट विचार ,वाईट प्रवृत्ती ,वाईट दृष्टीकोण या होळीमध्ये जळून चांगले विचार, सकारात्मक विचार निर्माण करणे हा या होळीचा अर्थ आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी असणारा सण म्हणजे रंगपंचमी आणि आपले आयुष्य सुद्धा या रंगाप्रमाणे नेहमी भरलेले असावे असा संदेश देणारा या सणाचा अर्थ असतो.

जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत पैसा टिकत नाही आर्थिक अडचणी आहेत पैसा येत नाही या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही तांत्रिक उपाय आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत आणि ही उपाय विशिष्ट तिथीला केल्यामुळे त्यांचे फळ सुद्धा चांगले प्राप्त होते आणि होळी ही पौर्णिमेच्या रात्री असल्यामुळे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या पौर्णिमेच्या रात्री आणि तसे महत्त्वाचे उपाय केले जातात जेणेकरून माता महालक्ष्मी खुश होईल व आपल्यावर कृपा वर्षाव करील म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा काही वस्तू ज्या आहेत ,त्या आपल्याला होळीच्या आधी घरांमध्ये आणायच्या आहेत.

मित्रांनो आपल्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवा असतो. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करतात यावेत आणि आपले आयुष्य आनंदी असावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी आपल्याला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये आणायचे असतात. पहिली वस्तू म्हणजे महालक्ष्मी यंत्र व कुबेर धन यंत्र,मित्रांनो यापैकी कोणतेही एक यंत्र आपल्याला होळीच्या आधी घरामध्ये आणायचे आहे. होळीच्या दिवशी आपल्याला हे यंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहेत यामुळे तुमच्या घरात कोणतीही धन समस्या राहणार नाही. आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत.

मित्रांनो त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे पिंपळाचे पान. त्यादिवशी पिंपळाचे पान घरी आणल्यावर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पाने पिंपळाच्या पानावर लिहायची आहे आणि ही पिंपळाची पाने होळीच्या दिवशी होळीमध्ये दहन करायचे आहेत आणि हात जोडून मनोभावे प्रार्थना करायचे आहे की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळस. जर तुम्हाला तुळस घरात लावायचे असेल तर होळीच्या आदल्या दिवशी नक्की तुळस लावा आणि बरेचदा असे होते की आपण नेहमी तुळस लावत असतो पण ती जळून जाते म्हणून जर तुम्हाला तुळस लावायचे असेल तर होळीच्या दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी जरूर तुळस लावा कारण की तुळशीमध्ये दिव्यशक्ती आकर्षित करण्याची शक्ती असते.

त्याचबरोबर आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती असते ती या तुळशीमुळे नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करून लागते. पुढील वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा सिक्का. माता महालक्ष्मी व श्री गणेश यांचे चित्र असणारा चांदीचा सिक्का होळीच्या आदल्या दिवशी आणायचा आहे आणि होळीच्या दिवशी आपल्याला हा चांदीचा सिक्का आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि मित्रांनो शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख. होळीच्या आधी तुम्हाला आपल्या घरांमध्ये मोरपंख आणायचे आहे. हे मोरपंख तुम्ही किती आणू शकता आणि आपल्या घराच्या विविध कोपऱ्यामध्ये ठेवू शकता.

होळीच्या दिवशी होळी पेटत असताना त्यावरून सात वेळा फिरवून पुन्हा आपल्या घरामध्ये हे मोर पंख ठेवायचे आहे.तुम्ही तुमच्या किचनमध्ये देवघरामध्ये आणि घरातील कोणत्याही कोपरा मध्ये हे मोर पंख ठेवू शकता आणि जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होत असतील पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असतील तर या सगळ्या गोष्टी या मोर पंखांमुळे थांबून लागतील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागेल.तरी या काही वस्तू होत्या ज्या तुम्हाला होळीच्या आधी आपल्या घरांमध्ये आणायच्या आहेत आणि आपले जीवन समृद्ध बनवून घ्यायचे आहेत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.