नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो पोटातील गॅस व पचन यापासून तात्काळ आराम मिळेल असा घरगुती उपाय आज आपण येथे जाणून घेणार आहोत.मित्रांनो, गॅस व अपचनाचे अनेकांना वेगवेगळे त्रास असतात. जेवणानंतर मळमळणे, गुळणी येणे, आंबट करपट ढेकर येणे, तसेच काही काळाने पोट फुगणे, गॅसेस वाढणे, शौचास आलेले नसतानाही आल्यासारखे वाटणे, इत्यादी वेगवेगळ्या समस्या आता जवळपास सर्वांनाच जाणवू लागल्या आहेत.
खास करून हा त्रास वयाच्या तिशी पस्तिशीनंतर जास्ती जाणवत असल्याची अनेकांची मते आहेत. याला अनेक कारणे असतात. पुरेशा झोपेचा अभाव असतो. सतत मनावर ताण तणाव, कामाचा ओढा असे अनेक नाना प्रकार याला कारणीभूत असतात.
मित्रांनो तुम्हालाही जर गॅस, अपचन आणि आंबट ढेकर येण्याची समस्या असल्यास ते टाळण्यासाठी आपण काही उपायांचा अवलंब करू शकता. पण ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणेच योग्य ठरू शकते.
चला तर जाणून घेऊया ही समस्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी काही रामबाण उपाय..
1) मित्रांनो तुम्हाला जर ही समस्या असल्यास तुम्ही जीवनशैलीमध्ये काही खास व लहान-सहान बदल करुन ही समस्या ठीक करू शकता. यासाठी तुम्ही दररोज एक्सरसाइज करा आणि अधिक मसालेदार अन्नपदार्थ खाणं कटाक्षाने टाळा.
2) मित्रांनो, वजन वाढल्यामुळे देखील या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही लठ्ठपणावर किंवा वजनावर नियंत्रण ठेवल्यास ही समस्या आपोआपच नष्ट होईल.
जे लोक मद्यपान आणि धूम्रपान करतात त्यांना ही समस्या टाळण्यासाठी या वाईट सवयी सोडून द्याव्या लागतील.
3) गॅस आणि अपचन या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने खाल्ले पाहिजे. जसे की आपण दिवसातून तीन वेळा खाता तर आपण तेच 6 वेळा विभागणी करून खाण्यास सुरूवात करा. एकाच वेळी जास्त खाणं टाळा.
4) मित्रांनो, रात्रीचे जेवण आणि झोपेमध्ये 2 तासांचे अंतर ठेवून सुद्धा तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. हे लक्षात ठेवा की झोपायच्या काही काळ आधीपर्यंत पाणी किंवा दूध काहीही पिऊ नका. याशिवाय, जेवणानंतर 30 किंवा 60 मिनिटे कोणत्याही प्रकारचे पेय पिऊ नका.
5) सकाळी चांगला भरपेट नाश्ता करा, दुपारच्या जेवणामध्ये थोडे कमी खा आणि रात्रीच्या जेवणामध्ये त्यापेक्षा कमी खा.
6) गॅस आणि आंबट ढेकरांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, झोपताना आपली मान थोडी उंचीवर ठेवून झोपा. यासाठी आपली मान 15 डिग्री पर्यंत वर असावी.वर सांगितलेले उपाय त्वरित कार्य करणार नाहीत.
कारण आपण जीवनशैली आणि आहारात बदल करीत आहोत त्यामुळे या समस्येपासून मुक्त होण्यास थोडा वेळ लागू शकतो. म्हणून धीर धरा.
जर आपल्याला जास्त काळ आंबट ढेकर येण्याची समस्या होत असेल आणि जीवनशैलीत बदल करुनही कोणताही फरक दिसून येत नसेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरकडे जा.
या समस्येचा सामना करण्यासाठी, डॉक्टर आपल्याला औषधे देऊ शकतात. पुढे, डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट घेऊन किंवा काही व्यायाम करून तुम्ही यापासून मुक्त होऊ शकता.
मित्रांनो वरील उपाय आहे वेगवेगळ्या माहिती स्त्रोत याच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहेत. त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. मात्र आपल्या जवळील डॉक्टरांचा सल्लादेखील घेणे आवश्यक आहे.
आरोग्य विषयक वेगळ्या समस्या त्यावर उपाय, तोटके इत्यादी माहिती व घरगुती तसेच वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र, लक्ष्मी प्राप्ति संतान प्राप्ती इत्यादी सर्व प्रकारच्या माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.