नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार आणि घरातील ज्येष्ठ व्यक्ती च्या म्हणण्यानुसार शनिवारी नखे किंवा केस कापू नये. असे केल्याने शनीचा कोप होतो आणि आपले नशीब वाईट होते, पण हे खरं आहे का..? तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि शनिवारी केस कापल्याने खरंच शनिदेव कोपतो का? कि हि फक्त एक अंधश्रद्धा आहे आणि मित्रांनो शनिवारी केस कापल्याने शनिदेव कोपतो त्यामुळे शनिवारी केस कापू नये असा अंधविश्वास आपल्या हिंदुधर्मामध्ये खूप प्रचलित आहे.
मित्रांनो जुन्या काळात गावांमध्ये एक किंवा जास्तीत जास्त २ न्हावी असायचे. अशावेळी या नाव्ह्यांना एकही सुट्टी मिळायची नाही. म्हणून त्या काळी या नाव्ह्यांनी असा गैरसमज पसरवला कि जर तुम्ही शनिवारी केस कपात असाल तर शनिदेव तुमच्यावर कोपेल आणि तुमचं काहीही चांगला होणार नाही. यामागचा त्यांचा हेतू एकाच जेणेकरून त्यांना एकदिवस सुट्टी घेता येईल आणि हि अफवा गावांमधून शहरांमध्ये सुद्धा पसरू लागली. त्यामुळे आजही कित्येक सलून शनिवारी बंद ठेवले जातात, म्हणून आमच्या मते हि एक अफवा आहे.
तुम्ही कोणत्याही दिवशी केस कापू शकता. अशाने कोणताही कोप तुमच्यावर होणार नाही. उलट शनिवारी केस कापायचा विचार करत असाल तर त्याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया, मित्रांनो पहिला फायदा म्हणजे शनिवारी सलून मध्ये जास्त गर्दी नसते. त्यामुळे तुम्ही पटकन तुमचे केस कापून आपल्या कामाला जाऊ शकता. दुसरा फायदा म्हणजे शनिवारी गर्दी कमी असल्याने न्हावी फ्रेश असतो. आणि तो कंटाळून जास्त घाई करत नाही त्यामुळे तुमचे केस चांगले कापले जातात.
तिसरा फायदा म्हणजे न्हावी हा असा व्यक्ती असतो ज्याला आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी माहित असतात. कारण त्याकडे कित्येक लोक येऊन केस कापता कापता गप्पा मारून जातात. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली माहिती अगदी सहज त्याच्याकडून काढून घेऊ शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो पुढचा वार आहे गुरुवार, मित्रांनो गुरुवार हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी केस कापल्याने लक्ष्मी माता रुष्ट होते. तसेच मानसन्मानाचीही हानी होते आणि त्याचबरोबर पोटाचे आजार जडण्याची संभाव्यता असते.
आणि या दिवशी ग्रहणाकडून येणारी किरणे शरीरावर प्रतिकुल प्रभाव पाडत असते आणि यामुळेच गुरुवारी देखील कधीही नखे कापू नये. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिष यांच्या म्हणण्यानुसार केस कापण्याचा शुभ दिवस रविवार, बुधवार व शुक्रवार आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी कधीही केस कापू नये. यामुळे बरेचसे नुकसान होऊ शकते