देवदर्शन घेताना ‘ही’ करू नका : घर बरबाद होईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, आपण नेहमी देव दर्शनासाठी मंदिरात जातो देव दर्शनासाठी जात असताना काही गोष्टी आपण पाळत नाही त्याचा परिणाम आपल्याला आपल्या जीवनावर दिसून येतो. काही अडचणी येत असतात पण आपल्याला कळत नाही की ही त्या अडचणी यामुळे येत असतात. देव दर्शनासाठी जात असताना काही गोष्टी कटाक्षाने पाळणे गरजेचे असते.

पहिली चूक म्हणजे पायात जोडे घालून देवदर्शनासाठी जाणे. अनेकदा लोक फोरविलर मधून जात असताना एखादे मंदिर दिसले की लगेच हात जोडून नमस्कार करतात हे आपल्याला कित्येकदा दिसून येते आणि आपणही तसे करत असतो पण असा नमस्कार करत असताना पायात आपल्या जोड्या असतात असे पायात जोडे घालून नमस्कार करणे फार मोठी चूक आहे. टू व्हीलर व फोर व्हीलरने जे लोक अनेकदा नमस्कार करतात. एकाच हाताने नमस्कार करत असतात. अशा नमस्कार आणि संबंधित असलेला देव आपल्यावर प्रसन्न होत नाही उलट तो देव क्रोधीत होऊ शकतो ज्यामुळे आपल्या समस्या वाढतात.

अनेक लोक डोक्याला टोपी घालून नमस्कार करतात प्रदक्षिणा घालतात अनेक वेळा पाहायला मिळते की लोक प्रदक्षिणा घालत असताना गप्पा मारत प्रदक्षिणा घालतात. देवा कडे न बघता प्रदक्षिणा घालत असता. इकडे तिकडे पाहत रमत प्रदक्षिणा घातल्या जातात. कधीही आपण प्रदक्षिणा घालत असताना त्या देवाकडे किंवा मंदिराकडे बघत प्रदक्षिणा घालाव्या. लोकांचे घर छोटे असते त्या छोट्या घरातच देवघर असतं. पण पण काही लोकांचे घर मोठे असते तरीसुद्धा ते ज्या रूममध्ये देवघर आहे त्या देवघरासमोर झोप घेणे, काही लोक पाय पसरून बसलेले असतात. ही पण फार मोठा सेवा अपराध आहे.

अंधारात देवमूर्ती ला स्पर्श करण. देवासमोर धूम्रपान करणं म्हणजेच सिगारेट ओढणे अशा गोष्टी करणे खूप मोठी चूक आहे. त्यामुळे देव आपल्यावर क्रोधीत होऊ शकतो. देवासमोर इतर लोकांना वंदन करणे. त्या मंदिरात सर्वश्रेष्ठ ही देवता आहे त्यामुळे देवासमोर व्यक्तीला वंदन करणे हे मोठे चूक करत आहे. पूजा करत असताना गप्पा मारणं. फुले व गंध वाहण्याआधीच धूप दाखवणे. म्हणजेच अगरबत्ती व धूप लावण्याआधी आपण फुले व गंध देवाला वाहले असले पाहिजे. स्वतःच्या कपाळी तीलक लावण्या आधीच पूजा करणे. पूजा करायच्या अगोदर आपल्या कपाळि तिलक लावले पाहिजे.

अनेकदा काही लोक आंघोळ करण्यापूर्वीच देवाची पूजा करतात. तर काही लोक मांसाहार, कोणत्याही प्रकारचे व्यसन करून देवाची पूजा करतात. ही फार मोठी चूक आहे. ज्यामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होत नाही. देवाला फुल पालथी वाहने ही फार मोठी चूक आहे. काही देवता देवदेवतांना काही फुले आवडत नाहीत फुलांनी त्या देवतेची पूजा करणं, पूजा करीत असताना मध्येच मलमुत्रसाठी त्यागासाठी जाणे हे फार मोठे अपराध आहे.

पूजा करीत असताना मध्येच मळमूत्रसाठी जाणे, जर तशी वेळ आलीच तर जाऊन आल्यानंतर अंघोळ करणे फार गरजेचे आहे. जेव्हा केव्हाही आपण मंदिरात देव दर्शनासाठी जात असतो मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा आपण घंटी वाजवतो. मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवून परत मंदिरातून बाहेर पडत असताना घंटी वाजवतात हे करणे चूक आहे यामुळे पुण्य आपल्याला लाभत नाही. एखाद्या मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिरात पाच ते दहा मिनिटे बसा. मग बाहेर पडत असताना कळसाला पाया पडून मगच बाहेर जा पुन्हा आपल्याला लागते.

मित्रांनो, जर तुम्ही तीर्थयात्रेला जात असाल जर तुमचे नुकतच लग्न झालेले असेल तर पती-पत्नीने त्यात तीर्थयात्रेला जाणे खूप शुभ असते. मंदिरात गेल्यानंतर एकाच हाताने नमस्कार करू नका आणि कधीच पायात चप्पल घालून नमस्कार करू नका. नमस्कार करत असताना उभारून नमस्कार करू नका. किंचित वाकून विनम्र भावाने नमस्कार करावा.

मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *