नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, सायंकाळची, तिन्ही सांजेची वेळ ही अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते. या तिन्हीसांजेच्या वेळेस लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करीत असते. प्रत्येकालाच आपल्या घरी लक्ष्मी प्रवेश करावी असे वाटत असते. परंतु मित्रांनो लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी काही नियम आपणाला पाळावे लागतात. जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरात येईल. अनेक जण तिन्हीसांजेच्या वेळेस दिवा, अगरबत्ती, धूप आपल्या घरांमध्ये लावतात. परंतु मित्रांनो हे लावत असतानाच आपणाला घरामध्ये देखील असे काही नियम पाळायचे आहेत जेणेकरून लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन घरात प्रवेश करील आणि आपल्या सर्व अडचणी संकटे दूर करील.
मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही तिन्हीसांजेच्या वेळेस दिवा, अगरबत्ती करत असता त्या वेळेस तुम्हाला एका मंत्राचा जप तीन वेळा करायचा आहे. हा जप केल्याने लक्ष्मीमाता आपला कृपा आशीर्वाद आपल्या घरावर कायम ठेवेल आणि आपले घर कायम आनंदी राहील. आपल्या आर्थिक समस्या, संकटे लक्ष्मीमाता दूर करतील.
मित्रांनो, तिन्हीसांजेच्या वेळेस आपल्या घरी अंधार नसावा यावेळेस कोणीही खाऊ-पिऊ नये किंवा त्यावेळेस कोणीही झोपायचे नाही. यावेळेस कोणीही भांडू नये जर घरामध्ये तिन्हीसांजेच्या वेळेस भांडणे होत असतील तर माता लक्ष्मी अशा घरांमध्ये कधीच प्रवेश करत नाही.
तर मित्रांनो, या तिन्हीसांजेच्या, सायंकाळच्या वेळेस दिवाबत्ती करून झाल्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप केल्याने आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल आणि आपल्या घरांमध्ये लक्ष्मीचे वास्तव्य नसेल तर मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही नित्यनेमाने केला पाहिजे. तो मंत्र नेमका कोणता आहे चला जाणून घेऊयात. तो मंत्र काहीसा असा आहे,
चंदनस्य महत पुन्यम् पवित्रम पाप नाशयम्
आप दाम हारते नित्यम लक्ष्मी तिष्ठतू सर्वदा
तर मित्रांनो, हा मंत्र तुम्हाला तिन्हीसांजेच्या वेळेस दिवा अगरबत्ती, धूप लावल्यानंतर तीन वेळा बोलायचा आहे. हा मंत्र बोलल्याने तुमचे जर कर्ज असेल ते काही केल्याने फीटत नसेल तर ते कर्ज फिटून जाईल. दिवा लावताना त्या दिव्यांमध्ये एक काळीमिरी एक किंवा एक लवंग तुम्ही टाकला तर आर्थिक बाबतीत कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. तर मित्रांनो या मंत्राचा जप तुम्ही दररोज तिन्हीसांजेच्या वेळेस तीन वेळा केला तर लक्ष्मी चा कृपाशीर्वाद तुमच्यावर होऊन लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव राहील.
मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.