नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या घरातील स्वयंपाक घर ही घरातली अशी एक जागा आहे त्या जागेतून सर्व सदस्यांचे पोषण होते म्हणून तर स्वयंपाक गृहांमध्ये काही दोष असतील तर त्याचा विपरीत परिणाम घरातील सर्व सदस्यांवर होतो.
जर स्वयंपाक घर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तीच ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सर्व सदस्यांना मिळत राहतो, आणि आपल्यातील प्रत्येकालाच असे वाटत असते की आपले स्वयंपाक घर नेहमी भरलेले असावे, आपल्या घरात अन्न धान्याची कमतरता भासू नये, आपल्या घरात बरकत राहावी.
मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक गृहांमध्ये काही वस्तू कधीही संपू देऊ नये. या वस्तू नेहमी थोड्या जास्त प्रमाणात आणल्या पाहिजेत किंवा संपण्यापूर्वीच आणायला हव्यात.जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते. त्याच बरोबर देवी अन्नपूर्णाची वास्तव्य आपल्या किचनमध्ये व पर्यायांने देवी लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये रहावे. असे आपल्या सर्वांनाच वाटते. त्यासाठी आपण विविध उपायही करीत राहतो.
आज आपण पाहणार आहोत देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णाचे आपल्या घरात कायम वास्तव्य राहण्यासाठी व घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाक घरातील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही संपवू नयेत त्या.
मित्रांनो या वस्तू नेहमी जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात किंवा संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात. जेव्हा या वस्तू घरातून संपूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मक निर्माण होते. अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत ज्या वस्तू कधीही संपू द्यायच्या नसतात. आपल्या आहारामध्ये मीठ हा सर्वांत महत्त्वाचा घटक पदार्थ आहे. परंतु मीठ हे प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते. परंतु कधी कधी थोडेसे मीठ शिल्लक राहते तेव्हा आपण विचार करतो हे मीठ उद्या आणू, आता संपूर्ण मीठ संपवतो.
परंतु घरातील मीठ हे कधीही संपवू देऊ नये. मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरात आणून ठेवायला हवे.
घरात मीठ संपणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण ठरते. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. यामुळे वास्तुदोष देखील होतो आणि त्याचा सर्वाधीक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो. तसेच घरात पैशा संदर्भात समस्या सुद्धा निर्माण होतात, मित्रांनो मिठाबरोबर आणखीन एक स्वयंपाक घरातील वस्तू आहे जी आपल्याला कधीही संपू द्यायची नाही ती म्हणजे हळद.
हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. अन्नामध्ये चव आणि सौंदर्य सुद्धा वाढवतो. हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये केला जातो, आपल्या प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर नक्कीच होतो. भगवान विष्णू यांनासुद्धा हळद प्रिय आहे. घरात हळद संपले म्हणजे गुरू ग्रहाचा दोष लागतो. म्हणून घरात हळद कधी संपवू देऊ नये. हळद संपण्यापूर्वीच दुसऱ्या हळदीचे पाकीट घरात आणून ठेवावे आणि एकत्र जास्त हळद घरात आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वीच नवीन हळद आणून ठेवा.
मित्रांनो आता तुम्हाला लक्षात आलेच असेल स्वयंपाक घरातील अशा कोणती वस्तू आहेत जी कधीच संपवू देऊ नये,तर या गोष्टीकडे लक्ष द्या आणि ही वस्तू संपण्यापूर्वीच घरी आणून ठेवा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.