गुरूवारच्या दिवशी महिलांनी करा ‘हे’ काम, घराची भरभराट होईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घराची भरभराट उन्नती प्रगती या महिलांच्या हाती असते. घरामध्ये सुख शांती समाधान जर नांदायची असेल तर या स्त्रिया प्रसन्न असणे,त्यांचे मन आनंदितअसणे फार महत्त्वाचे असते. मित्रांनो हिंदू धर्मशास्त्र मध्ये महिलांना स्त्रियांना फार मोठा दर्जा दिलेला आहे आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीने दररोज सकाळी काही छोटी छोटी कार्य अवश्य करावी.जेणेकरून घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेने जेवणापूर्वी गोग्रास अवश्य करावा ते फार आवश्यक आहे याचा अर्थ गोमातेला आपल्या घरात बनलेली पहिली भाकरी अगर पहिली चपाती रोटी खाऊ घालावे कारण मित्रांनो गायी मध्ये 33 कोटी देव देवतांचा वास असतो आणि ज्या घरात या नियमाचं पालन होते, गोमातेला पहिला घास खाऊ घातला जातो त्या घरात गो मातेच्या कृपेने पैश्याची कमतरता कधीच भासत नाही.मात्र अनेकांना हे दररोज करणे शक्य होत नाही अशा वेळी आपण कमीत कमी गुरूवारच्या दिवशी तरी ही क्रिया अवश्य करायला हवी.

गुरूवारच्या दिवशी गाईला नैवैद्य अवश्य द्या. एखादी व्यक्ती आजारी आहे, तुमच्या घरात आजारपण आहे. लोक सुखी होत नाहीत अशा वेळी आजारी व्यक्तीच्या हातून आपण गोमातेला ही भाकरी किंवा चपाती खाऊ घाला आणि तिच्या पाठीवरून प्रेमभावनेने हात फिरावयास सांगा.हा उपाय केल्यास आपल्याला नक्की फळ प्राप्त होते, मित्रांनो त्यानंतरची दुसरी गोष्ट आपल्या पितरांच्या शांतीसाठी, आपल्यातील आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा मृ’त्यू झालेला असतो तेव्हा आपण वेगवगळ्या प्रकारचे कार्य करतो,श्राद्ध तर्पण इत्यादी केली जातात जेणेकरून आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लागेल.

तर आपण आपल्या घरात जे काही पदार्थ असतील, हे पदार्थ एकत्र करून आपल्या पितरसाठी आपल्या बालकनी मध्ये आपल्या अंगणात ठेवली आणि कावळ्याने पक्षाने पदार्थ ग्रहण केले तर समजुन जा की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न आहे आणि जर कावळा हे पदार्थ खात नसेल, हा घास ग्रहण करत नसेल तर लक्षात घ्या तुमचे पितर यातना भोगत आहेत आणि त्यांच्या आत्म्यास शांती लागण्यासाठी आपण काही उपाय करण्याची आवश्यकता आहे.

आपल्या पितरांच्या नावाने आपण आपल्या घराबाहेर नक्की एक घास ठेवायला हवा. ज्या ठिकाणी एक घास महिला किंवा पुरुष ठेवताना दिसून येतात. हा घास घरात ठेवला जातो, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवे की कावळाच्या रूपाने वेगवेगळ्या पक्षांच्या रूपात आपले पितर आपल्या जवळ येत असतात आणि म्हणून कावळ्याला हा घास देणे महत्त्वाचे असते.

जे आपले घर असते त्या घराच्या आजूबाजूला अनेक आत्मा वावरत असतात.त्या दुष्ट शक्ती म्हणून गणल्या जातात आणि त्या दुष्ट शक्तींचा त्रास हा आपल्या घरातील व्यक्तींना सदस्यांना होऊ शकतो. लहान मुले असतात ,वृध्द व्यक्ती असतात अशा दुष्ट शक्‍ती त्रास देताना दिसून येतात तर तो सुद्धा अत्यंत साधा सोपा उपाय आपण करू शकतो. सकाळी दुपारी जेवनातील एक घास आपण आपल्या घराभोवती कोठे ही ठेऊ नका तो व्यवस्थित एका बाजूला ठेवा आणि परत घरी या.

त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी काही उपाय केल्याने आपले पितर शांत होतात. जर एखादा गरीब व्यक्ती जर तुमच्या दारात आला असेल तर त्याला काही थोडेफार पैसे देऊन कधीतरी खाऊ घाला कारण भुकेलेल्यांना अन्न देऊन जर त्यांचा आत्मा तृप्त झाला तर त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात ते पैशांपेक्षा कितीतरी पट अधिक असतात आणि या गोरगरिबांच्या आशीर्वाद मुळे आपले नेहमी कल्याण होते.

आपल्या हातून घडलेली कळत नकळत झालेली पापकर्म ही धुतली जातात आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू लागते आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जेव्हा जेव्हा एखादा भिकारी जरी आला त्याला अन्नदान नेहमी करा. तुमच्या घराच्या आसपास तुमच्या घरात जर मुंग्या तुम्हाला दिसल्या तर गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर टाकून साखरेचा चुरा करा. हे दोन पदार्थ एकत्र करा आणि या साखरेचा चुरा खाऊ घाला. कर्ज फिटत नसेल किंवा त्याच्याकडून पैसे घेतले ते पैसे परत मिळत नसेल तर अशावेळी हा उपाय केल्याने आपले कर्ज लवकर फिटते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *