नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्यातील प्रत्येकला असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो परंतु काही दोष, अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येते, अडचण येते, परंतु मित्रांनो अशावेळी जर आपण आपल्या वास्तुशास्त्राचे मदत घेतली आणि त्यामध्ये सांगितलेले उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे या सर्व संकटांपासून आपली सुटका होते.
मित्रांनो आज आपण असाच एक प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत हा उपाय तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी केला तर यामुळे तुमची सर्व अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील आणि त्याच बरोबर तुम्ही हाती घेतलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल.म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचण येणार नाही.
मित्रांनो आपल्यातील बरेच स्वामी समर्थांचे सेवेकरी गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांचे केंद्रांमध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेत असतात आणि घरांमध्येही त्यांची विधीवत अपनी पूजा करत असतात कारण गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या स म स्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल.
मित्रांनो स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार, स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार होय. गुरुवारी केली जाणारी कामे , सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो. त्याच बरोबर हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान जरून स्वच्छ मनाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा. जप माळेने हा मंत्र जप करायचा आहे.
मित्रांनो काय करत असताना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सकाळी अंघोळीनंतर हेच काम करायचं आहे. एक जप माळ घेऊन मन शांत, एकाग्र करून या मंत्राचा जप करा, मंत्र असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. या नंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे. यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गूगल वरती सर्च करून घेऊ शकता.
मित्रांनो गुरुवारच्या दिवशी हे तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने व भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होईल. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते.
अशक्य ते शक्य करतील स्वामी असे बोधवाक्य सांगितले जाते. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील परंतु प्रत्येक गुरुवारी अंघोळ करूनच हा उपाय करा. आपण जेव्हा पूर्ण भक्तीने, निस्वार्थीपणे स्वामींना, गुरू माऊलीना हाक मारतो तेव्हा आपल्या मदतीला स्वामी नक्की धावून येतात व आपल्याला सं’कटातून तारतात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.