नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीची पूजा केली जाते. तसेच आपण केलेली पूजा महादेवांपर्यंत पोहोचली तर इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यासाठी शिवलिंगावर दूध, चंदन, भस्म, भांग, धोतऱ्याची फुले इत्यादी अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. या पूजेलाच जोड द्यायची आहे एका उपासनेची, जेणेकरून त्या उपासनेच्या प्रभावाने आपले वास्तू दोष मिटतील, चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती उपासना आणि पूजा आहे ती जी आपण जर महाशिवरात्रि दिवशी केली तर त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील आणि घरामध्ये शांतता सुख-समृद्धी नांदेल.
मित्रांनो महाशिवरात्री १ मार्च रोजी साजरी होणार आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जर एकाच घरात आपसी कलह, रोगराई किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते, त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा त्याचबरोबर जर घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेलचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे.
तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा मित्रांनो या दिवशी असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो आणि त्याचबरोबर घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते आणि तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते, त्याचबरोबर मित्रांनो महाशिवरात्रीला आणखीन एक महत्त्वाचे आपल्याला जे काम करायचे आहे ते म्हणजे यादिवशी शंकराला बेलपत्र वाहावे आणि रुद्राभिषेक करावा परंतु मित्रांनो रुद्राभिषेक सुरु असताना मनोमन ओम नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बेलपत्रामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरातील वाईट शक्ती ही दूर होण्यास मदत होते.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की महाशिवरात्रि दिवशी महादेवाला कोणत्या प्रकारचा नैवेद्य दाखवावा तर मित्रांनो महाशिवरात्रीला महादेवांना शक्यतो पांढऱ्या रंगाचा कोणताही पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवा महादेवांना पांढरा रंग हा अत्यंत प्रिय आहे म्हणूनच पांढरा रंग असणाऱ्या गोष्टी किंवा पदार्थ महादेवांना नैवेद्य म्हणून दाखवावे आणि त्याच बरोबर पांढऱ्या रंगाच्या वस्तू आपण या दिवशी महादेवाला अर्पण करावे. मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर शिवरात्रीच्या दिवशी शंकराला दही भाताचा नैवेद्य दाखवावा.
मित्रांनो हे सर्व उपाय पुजा विधी आपण महाशिवरात्रीला केलेच पाहिजेत परंतु त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जर एखाद्या गरज वंताला पोटभर अन्न किंवा शिधा द्यावा त्यामुळे आपल्या घरातील देखील वास्तू पीडा कमी होते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.