महाशिवरात्रीला घरामध्येच महादेवाची पुजा कशी करावी, जाणुन घ्या सविस्तर माहिती!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो माघ मासात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला महाशिवरात्री असे म्हटले जाते आणि मित्रांनो यंदाच्या वर्षी १ मार्च रोजी महाशिवरात्री आली आहे आणि या दिवशी उपास करून भगवान शंकराचे ध्यान करावे आणित्याचबरोबर महाशिवरात्रीला भारतातील अनेकविध ठिकाणी महादेवाची पूजा मोठ्या प्रमाणात करता येते. तसे पाहिल्यास प्रत्येक मराठी महिन्यात शिवरात्र असते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्र, महाशिवरात्री म्हणून साजरी करण्यात येते, मित्रांनो यावर्षी माघ वद्य चतुर्दशीला म्हणजेच १ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे.

मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. महाशिवरात्रीदिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निशीथकालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. श्री ओम नमः शिवाय आणि ‘श्रीशंकराय नमः किंवा श्री रुद्राय नमः या मंत्रांचा जप या दिवशी दिवसभर शक्य होईल त्यावेळी करत राहावे,

तसेच या दिवशी महादेवांचे विशेष महत्त्व असल्यामुळे त्यांना पंचामृत अर्पण करावे आणि पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा, यानंतर गंध, अक्षता, फुले वहावित,नैवेद्य दाखवून झाल्यानंतर शंकराचे नामस्मरण करावे. त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या घरी महादेवाची पिंड किंवा प्रतिमा असेल तर चौरंगावर विधीवत ठेऊन पूजा मांडावी. पिंड किंवा प्रतिमा नसेल तर वाळूची पिंड मांडून पूजा करावी. पहाटे स्नान करून पूजा करावी. या पूजेला देवाला अभ्यंगस्नान घालावे. बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर वाहाव्यात.

आणि त्यानंतर शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृतानी स्नान घालावे आणि या दिवशी ओम नम: शिवाय सह महादेवांचे इतर प्रभावी स्मरणात जागरण करावे. शिवपूजेत हळद-कुंकू न वापरता भस्म वापरावा, तर शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात, नैवेद्य दाखवावा आणि निरांजन ओवाळावं आणि आरती करावी. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार या दिवशी उपवासाचे ही विशेष महत्त्व आहे म्हणूनच अनेक महादेवांचे भक्त उपवास करतात, शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केले जातात.

परंतु मित्रांनो ठराविक प्रमाणात घेतलेला ठराविक आहार शरीरावर विशिष्ठ परिणाम करतात. म्हणून शरीर शुद्धीकरणासाठी आणि मन सजग आणि शांत बनते.

त्याचबरोबर आपल्यातले काहीजण दूध आणि फळे खाऊन उपवास करतात आणि काहीजण निव्वळ पाणी पिऊन उपवास करतात. परंतु मित्रांनो या दिवशी उपवास करत असताना थोडीशी फळे आणि पाणी पिऊन उपवास करावा किंवा पचायला हलका आहार घेऊन उपवास केल्याने शरीर हलके रहाते. उपवासासोबत रात्रभर आराधना, प्रार्थना आणि ध्यान करत जागरण करावे. महाशिवरात्रीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने जर आपल्या आपण आपल्या घरामध्ये महाशिवरात्रीची पूजा आजच्या केली तरीही महादेव आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *