नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच १ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक करण्याचे वर्णन विविध ग्रंथ आणि पुराणांमध्ये आढळते. धार्मिक दृष्टिकोनातून अशीही एक धारणा आहे की महाशिवरात्रीला उपवास केल्याने योग्य जोडीदार मिळतो. महादेव महाशिवरात्रीचे व्रत ठेवणाऱ्यांना आर्थिक आणि कौटुंबिक सर्व समस्यांपासून वाचवतात.
परंतु मित्रांनो महाशिवरात्री आणि मासिक शिवरात्रीच्या उपवासाचे व पूजेचे फायदे फार कमी लोकांना माहिती आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की या दिवशी शिवाच्या पूजेमध्ये लोक सहसा शिवाला पाणी, दूध, पांढरी फुले, अक्षदा, पांढरे चंदन, साखर इत्यादी अर्पण करतात. या सर्व गोष्टी चंद्राशी संबंधित असल्याचे मानले जाते. या गोष्टी भगवान शिवाला अर्पण केल्यावर शिवाच्या मस्तकावर बसलेल्या चंद्राचीही पूजा केली जाते आणि चंद्राची शक्ती वाढते.
मित्रांनो आज आपण असाच एक प्रभावी उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या सुटतील आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये पैसा आकर्षित होईल.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला महादेवांना आवडणारी एक विशेष वस्तू आपल्या कपाटात किंवा घरामध्ये असणाऱ्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे, यामुळे आपल्या घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहील आणि त्याचबरोबर घरांमध्ये असणारी आर्थिक समस्याही दूर होईल.
मित्रांनो महाशिवरात्री दिवशी आपल्या कपाटामध्ये ठेवायची ती एक वस्तू म्हणजे बेलपत्र मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की बेल पत्र हे महा देवांना किती प्रिय आहे ते, मित्रांनो जर तुमच्या घराशेजारी बेलाचे झाड असेल तर तिथून तुम्ही या दिवशी सकाळी लवकर बेलपत्र चे एक पान आणू शकता आणि जर तुमच्या घराच्या आसपास याचे झाड नसेल तर पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये किंवा फुलांच्या दुकानांमध्ये तुम्हाला बेलपत्राच पान नक्की मिळून जाईल येथून ते या दिवशी तुम्हाला घरामध्ये आणायचा आहे आणि महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे.
त्याचबरोबर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर तुम्ही हे बेलपत्र तुमच्या घरातील कपाटांमध्ये मध्ये ठेवायचा आहे आणि त्याच बरोबर जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ऑफिसमध्ये गल्ल्यात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणीही या बेलपत्राच पान ठेवायच आहे. यामुळे तुमच्या व्यवसाय मध्ये वाढ होईल आणि त्याच बरोबर घरामध्ये आणि जर कामाच्या ठिकाणी बेलपत्र या दिवशी ठेवलं तरी यामुळे कधीही तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही आणि महादेव की तुमच्यावर प्रसन्न होतील.
त्याचबरोबर या दिवशी बेलपत्र आजही विशेष महत्त्व असते त्यामुळे सकाळच्या वेळी बेलपत्र आणल्यानंतर त्याला देवघरामध्ये ठेवून त्याची विधिवत पणे पूजा करूनच मगच आपल्याला हे बेलपत्र या उपायासाठी वापरायच आहे. मित्रांनो अशाप्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी तुम्ही जर तुमच्या तिजोरीमध्ये या बेलपत्राच एखाद तरी पान ठेवलं तर यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होऊन तुमच्या घराकडे पैसा आकर्षित होऊ लागेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.