शिव मंत्र : राशीनुसार शिव मंत्राच्या जपाचा घ्या असा लाभ : पापातून मुक्ती, सर्व कामात यश प्राप्ती !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो, महाशिवरात्रीस आपल्या देशातील एक प्रमुख सण समजण्यात येते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीस शिवरात्र साजरी केली जाते. देश – विदेशातील शिव भक्तही शिवरात्रीस भरपूर उत्साहाने साजरी करतात. पौराणिक कथा व मान्यतेचा आधार घेतल्यास महाशिवरात्रीच्या दिवशी मध्य रात्री भगवान शिवलिंगाच्या रूपात अवतरित झाले होते. सर्व प्रथम शिवलिंगाचे पूजन भगवान विष्णू व ब्रह्माजी ह्यांनी केले होते. काही ठिकाणी शंकर – पार्वतीच्या विवाहाचा हा  दिवस असल्याचे समजून ती साजरी केली जाते. 

राशीनुसार शिव मंत्र
मित्रांनो, महादेव शंकर हे लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे. ते आपल्या कोणत्याही भक्तास निराश करत नाहीत. इतकेच नव्हे तर शंकराची पूजा इतर देवता सुद्धा करतात, म्हणूनच त्यांना देवांचे देव महादेव असे सुद्धा संबोधले जाते. असे म्हटले जाते कि जर आपल्या राशीनुसार भगवान शंकरांच्या काही विशिष्ट मंत्रांचा जप व्यक्तीने केला तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांना अपेक्षित यश प्राप्त होते. इतकेच नव्हे तर सर्व पापां पासून सुद्धा भक्तांना मुक्ती मिळते. 

पाहुयात राशीनुसार मंत्रांचे विशेष फायदे 
मेष रास 
मित्रांनो मेष ह्या राशीच्या जातकांवर भगवान शिव ह्यांची विशेष कृपा दृष्टी असते. ह्यांच्या जीवनात पूर्वी ज्या काही समस्या येत होत्या त्या सर्व आता संपुष्टात येऊ शकतात. सर्व खोळंबलेली कामे पूर्णत्वास येतील, इतकेच नव्हे तर आपण कोणी नवे मित्र बनविलेत तर हि मैत्री दीर्घ काळ टिकू शकेल. मेष राशीच्या व्यक्तींनी लाल व आकडयाच्या फुलांनी शंकराची पूजा करावी. मेष राशीच्या जातकांनी “नागेश्वराय नमः” ह्या मंत्राचा जप सकाळी पूजे दरम्यान करावा. त्यामुळे आपणास सर्व कार्यात यश प्राप्त होईल. 

वृषभ रास 
मित्रांनो, वृषभ राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीच्या दिवशी मनापासून शंकराची आराधना करावी व पूजे दरम्यान रुद्राष्टकाचे पठन करावे. त्याने आपल्या आर्थिक स्थितीसह मानसिक स्थितीवर सुद्धा सकारात्मक प्रभाव होत असल्याचे दिसून येईल. आपण चिंता मुक्त जीवन जगू शकाल. आपल्या कुठल्याही कामात अडथळा येणार नाही.

मिथुन रास 
मित्रांनो मिथुन राशीच्या व्यक्तींनी उसाच्या रसाने शंकरास अभिषेक करून बिल्वपत्र अर्पण करावे. ह्याच बरोबर पंचाक्षरी मंत्र “नमः शिवाय” ह्याचा जप केल्यास तो लाभदायी होईल. 

कर्क रास 
मित्रांनो कर्क राशीला ह्या वर्षी हि शिवरात्र आपणास यशदायी ठरेल, मात्र त्यासाठी आपणास “सोमनाथाय नमः” ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा लागेल. त्याने आपणास जीवनातील सर्व आघाडयांवर यशाची प्राप्ती होऊ शकेल. 

सिंह रास 
मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या राशीच्या जातकानी गूळ मिश्रित पाणी व गहू शंकरास अर्पण करावे. ह्या राशीच्या व्यक्तींनी महामृत्युंजय मंत्राचा १०८ वेळा जप करावा. त्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. इच्छाही पूर्ण होतील.

कन्या रास 
मित्रांनो कन्या राशीच्या जातकांसाठी हि महाशिवरात्र एक नवे चैतन्य घेऊन येत आहे, त्यामुळे त्यांच्या सभोवतालची नकारात्मकता दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. शिव पंचाक्षरीचा जप हा आपल्यासाठी एक रामबाणा सम उपाय आहे.   

तूळ रास 
तूळ राशीच्या जातकांसाठी हि महाशिवरात्र आर्थिक व सामाजिक स्तरावर मोठे परिवर्तन घडवून आणणारी आहे. आपण शिव सहस्त्र नामावलीचे पठन करू शकता.  आणि सध्या सुरू असणारे प्रॉब्लेम्स दूर करू शकता.

वृश्चिक रास 
आपल्यासाठी श्रावण महिन्यात रोज पंचामृताने शंकरावर केलेला अभिषेक कल्याणदायी असल्याचे मानण्यात येते. आपण रुद्राष्टकासह “शिव – पार्वत्यै नमः” ह्या मंत्राचा जप करावा. 

धनु रास 
ह्या राशीच्या जातकांना ह्या वर्षी महाशिवरात्री दरम्यान नवीन कार्यात सफलता प्राप्त होईल. त्यासाठी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा विधी नंतर १०८ वेळा “नमः शिवाय” मंत्राचा जप करणे हितावह राहील. 

मकर रास 
मित्रांनो मकर राशीच्या जातकानी विधिवत पूजन करून गहू दान करावेत त्याच बरोबर “शिवाय नमः” ह्या मंत्राचा जप करावा. त्याने आपले अडकलेले पैसे मिळतील व कारकिर्दीत प्रगती घडेल. 

कुंभ रास 
ह्या राशीच्या जातकांना ह्या महाशिवरात्रीस आपल्या जीवनातील विविध परीक्षेतून जावे लागेल. आपल्यासाठी शंकराच्या आराधने शिवाय कोणताच तरणोपाय नाही. आपण शिव षडाक्षर मंत्राचा १०८ वेळा जप करावा, ज्याने आपल्या जीवनात स्थैर्य प्राप्त होईल. 

मीन रास 
मित्रांनो आपली जर मीन रास असेल तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची आराधना करताना रावण रचित शिव तांडव वाचावे. कारण ह्या वेळेस आपल्या जीवनातील अनेक कठीण समस्यांना आपणास सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पूजे दरम्यान हे विशिष्ट पठन केल्याने आपण आपल्या समस्या दूर करू शकाल. 

महाशिवरात्रीच्या शुभकामनेसहित 
आपण आपल्या राशीनुसार किंवा कुंडली विश्लेषणानुसार सुद्धा इष्ट पूजन करू शकता. आपली इष्ट देवता कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या तज्ञ ज्योतिषांशी आपण संपर्क साधू शकता. 

भगवान शंकरांचा महिमा, श्री महादेवाची विविध प्रकारची माहिती तसेच अडचणी व उपाय यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *