नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्र म्हणतात. एरवी प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोद शीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्री दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण महाशिवरात्रि विषयी माहिती जाणून घेत आहोत.
महत्व
मित्रांनो महाशिवरात्री निमित्त विविध प्रकारचे महत्त्व सांगण्यात येते. यानुसार पहिले महत्व म्हणजे अशी मान्यता आहे की, काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय.
तर तर मित्रांनो, काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती. अशा अनेक आख्यायिका नुसार माहिती आपणाला ऐकावयास मिळतील, पहावयास मिळतील.
महाशिवरात्रीची पूजा :
मित्रांनो, महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.
जागरण :
मित्रांनो, महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.
मित्रांनो, भगवान शंकरांच्या अनेक महिमा आपणाला माहिती आहेत. त्यांची आराधना उपासना केल्यास ते लवकरच प्रसन्न होतात. आणि आपल्या आराधना उपासना मार्गी लागतात इच्छित सर्व कार्य पूर्ण होतात.
मित्रांनो आपण सातत्याने भगवान शंकरांचा ओम नमः शिवाय असा नाम जप केला पाहिजे. भगवान शंकर म्हणजेच देवांचा देव महादेव यांना नतमस्तक होऊन आपल्या व्यथा आपल्या अडचणी सांगून श्रद्धेने त्यांचे नाव ऊस म्हणून करावे. यामुळे आपले आयुष्य सुखकर होते समृद्धीमय बनते.
भगवान शंकरांच्या व महाशिवरात्रीच्या सविस्तर माहितीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.