महाशिवरात्री दिवशी हे एक फळ नक्की घरी आणा, घरात पैशांचा ढीग लागेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र आणि हा भारतीय कॅलेंडरमधील एक महत्वाचा सोहळा मानला जातो ही रात्र एवढी महत्वाची का आहे आणि आपण तिचा वापर कसा करून घेऊ शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित असेल की भारतीय संस्कृतीत एके काळी वर्षभरात तब्ब्ल 365 सण साजरे केले जात असत. मित्रांनो सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, आपल्याला वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे आणि हे ३६५ सण विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध उद्देश डोळ्यासमोर ठेऊन साजरे केले जात होते.

परंतु महाशिवरात्रीचे महत्व काही वेगळेच आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील १४ वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महा शिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. त्याचबरोबर आपल्या शास्त्रांमध्ये असं मानलं जातं की,या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो आणि म्हणून याचा वापर करून घेण्यासाठी या रात्री आपल्याला हा एक उपाय करायचा आहे.

मित्रांनो हा असा सोपा आणि घरगुती उपाय जर आपण आपल्या घरी केला तर यामुळे नक्कीच आपले भाग्य बदलणार आहे आणि येणारे भविष्य देखील खूप उज्ज्वल असणार आहे. चला तर मग हा उपाय काय आहे ते जाणून घेऊया. आपल्याला कदाचित माहीत नसेल पण अनेक लोक या रात्री अनेक उपाय करत असतात. तसेच या रात्री केलेले उपाय हे अत्यंत प्रभावशाली असतात आणि लवकरच फळ मिळणारे असतात. तसेच हा उपाय केल्यास आपल्या घरातील भांडणे, दारिद्र्य, पैशांची कमी अशा अनेक समस्या नाहीशा होणार आहेत.

तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी लाल रंगाचा कपडा लागेल, सोबतच धोतऱ्याचे एक फळ तसेच आपण घेतलेले कापड हे मोठे असावे जेणेकरून त्यामध्ये हे फळ आपल्याला बांधता आले पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला महाशिवरात्री दिवशी शिव मंदिरात जाऊन हे फळ शिवलि-गांवर अर्पण करायचे आहे. त्यानंतर बाहेर येऊन बसून आपल्याला १०१ वेळा शिव मंत्र म्हणायचे आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मंदिराच्या गभाऱ्यात जाऊन हे धोतऱ्याचे फळ त्या लाल कपड्यात बांधायचे आहे.

त्यानंतर मनोभावे शिव शंकरासमोर नतमस्तक होऊन आपली जी काही इच्छा, आकांक्षा आहे ती बोलून दाखवयाची आहे. आपली जी काही स म स्या असेल ती येथे बोलायची आहे. त्यानंतर आपण त्या कपड्यामध्ये बांधलेले धोतऱ्याचे फळ घरी घेऊन यायचे आहे आणि पहाटे आपण जेथे काम करतो तेथे हे बांधायचे आहे.तसेच जर हा उपाय जर आपण आपल्या शेतीसाठी करत असाल तर ईशान्य कोपऱ्यात एक खडा पाडून हे फळ त्या कपड्यासहित पुरायचे आहे.

परंतु मित्रांनो हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात घ्या कि हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्री बरोबर बारा वाजता कोणालाही न सांगता गुपचूप पणे करायचा आहे.
हा उपाय केल्यानंतर नक्कीच आपल्याला काही दिवसात परिणाम जाणवणार आहेत. आपल्या घरात काही दिवसांतच लक्ष्मीचे आगमन होईल तसेच आपल्या घरातील सर्व समस्या नाहीशा होतील आणि आपल्या घराची आणि आपल्या मुलांबाळाची प्रगती होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *