मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी करा ‘हा’ उपाय : शंभर टक्के यशस्वी व्हाल

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते आपल्याकडे एक चांगल्या पगाराची नोकरी असावी आणि ती टिकून राहावी. आजकाल सर्वांनाच गव्हर्मेंट जॉब मिळेल अशी काही खात्री नसते त्यामुळे प्रायव्हेट जॉब करावी लागतात.

प्रायव्हेट जॉब मध्ये सतत आपल्या डोक्यावर टांगती तलवार राहते ते म्हणजे की कधी नोकरी जाईल कधी आपण बेरोजगार होऊ असं टेन्शन प्रत्येक प्रायव्हेट कंपनी मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला असत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर अनेक जण असे आहेत ज्यांना नोकरी संबंधी प्रॉब्लेम्स आहेत.

आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत की तुम्ही केला तर तुम्हाला काही दिवसांमध्येच एक चांगली नोकरी मिळेल आणि ती टिकून राहील तुमच्या मनासारखा जॉब तुम्हाला मिळेल
सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की चिंता करणे सोडून द्या.

तुम्ही म्हणाल की चिंता करू नका असं कसं होईल पण मित्रांनो हे सरावाने शक्य आहे कारण मित्रांनो जर आपण चिंता केली तर आपली योग्यता कमी होते अस म्हणतात की,

चींता से चतुराई घटे, घटे रूप और ज्ञान
चिंता बडी अभागिनी चींता चीता समान!

त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट आहे की तुम्ही चिंता करू नका आणि पॉझिटिव्ह विचार करा की मला चांगली नोकरी लागेल. मला हवा तसा जॉब मिळेल.

मित्रांनो, जर तुम्ही असा विचार केला की सध्याची परिस्थितीच अशी आहे नोकरीच लागणार नाही नोकरी मिळण्याचे इम्पॉसिबल आहे तर तुम्हाला नोकरी लागणारच नाही. पण जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर या विचाराने 50 टक्के काम होऊन जातं.

त्याच बरोबर शास्त्रांमध्ये सांगितलेले काही उपाय आपल्याला करायचे आहेत. अगदी सोपे आहे तुम्ही सहज करू शकता. तुम्हाला शनिवारच्या दिवशी दूध, गूळ आणि पाणी हे मिक्स करून पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे.

एका तांब्या मध्ये पाणी घेऊन त्यात थोडासा गूळ आणि थोडेसे दूध टाकून हे पाणी हे जल आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचा हे लक्षात ठेवावे. आपल्या शनिवारच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर दररोज आदित्य हृदय स्तोत्र याचा आपल्याला पाठ करायचा आहे.

तुम्हाला गुगल वरती हे स्तोत्र सहज मिळेल तुम्ही सर्च करून पाहू शकता हा पाठ करण्यासाठी तुम्हाला फक्त दहा मिनिटे लागतील. तर तुम्हाला दररोज हा पाठ करायचा आहे. त्याच बरोबर रविवार किंवा मंगळवार या दोन्हीपैकी कुठल्याही एका दिवशी तुम्हाला अळणी भोजन करायच आहे.

म्हणजेच जेवणामध्ये मी तुम्हाला मीठ घ्यायचं नाही. तुम्ही या दिवशी दूध भाकरी खाऊ शकता किंवा इतर कुठलाही पदार्थ त्यामध्ये मीठ घातले जाणार नाही असा पदार्थ तुम्ही या दिवशी खाऊ शकता.

मित्रांनो, रविवार किंवा मंगळवार या दोन्हीपैकी कुठला तरी एक दिवस तुम्ही निश्चित करा आणि त्यादिवशी तुम्हाला अळणी भोजन करायचे आहे त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून तुम्हाला आपल्या कपाळावर तिलक करायचा आहे.

मग हि तिलक कुंकवाचा असो किंवा चंदनाचा असो हा तिलक करून तुम्हाला संकल्प करायचा आहे की माझं भाग्य चमकेल. माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील असा तुम्हाला संकल्प करायचा आहे.

तुम्ही काही दिवसातच पाहू शकता की या उपायाने तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील.

तुम्हाला एक चांगली तुमच्या मनासारखी नोकरी लागेल आणि ती टिकून देखील राहील. तर मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये असे बरेच उपाय सांगितले गेले आहेत जेणेकरून आपण आपले दुर्भाग्य सौभाग्य मध्ये बदलू शकतो.

मित्रांनो तुम्हाला देखील प्रॉब्लेम असाल तर तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. मित्रांनो माहिती आवडली असेल तर पेजला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांच्या माहितीसाठी शेअर करायला विसरू नका.

वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोषातून तसेच वेगवेगळ्या शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेले आहे त्याचा कोणीही अंधश्रद्धेचे संबंध जोडू नये ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *