शनीपासून मुक्ती मिळवण्यासाठी, सर्व दोष दूर करण्यासाठी : शनिवारी करा हा उपाय : शनि देव प्रसन्न होतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीत आहे की, शनिदेवाची ज्यावर वक्र दृष्टी पडली त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शनि हा असा देव आहे जो मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतो, म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शनिची दिशा खराब होत असेल तर अशा व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. इतकेच नाही तर ज्याच्या कुंडलीत शनि अशुभ स्थानावर बसला असेल, त्यांना जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

त्याचबरोबर मित्रांनो शनिवार हा दिवस शनी देवाचा दिवस आहे. ज्‍योतिषशास्‍त्रानुसार कुंडलीत शनीच्या स्थानाला खास महत्त्व असते. शनीच्‍या शुभ किंवा अशुभ स्थानामुळे मनुष्‍याच्‍या जीवनात सुख- दुखा:ची स्थिती निर्माण होते. शनीचा सर्वाधिक परिणाम साडेसातीमध्‍ये सहन करावा लागतो. प्रत्‍येक व्‍यक्‍तीला शनीची साडेसातीला सामोरे जावे लागते.

तर मित्रांनो अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त विविध उपाय करत असतात, आपल्या शास्त्रातही असे मानले जाते की शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. मित्रांनो आज आपण अशाच शनिवारी करायचा उपाय बद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आणि हे उपाय जर आपण शनिवारच्या दिवशी केले तर आपल्या कुंडलीत शनि दोष कमी होईल आणि शनि देवाची कृपा आपल्यावर राहील, चला जाणून घेऊ शनिदेवाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय.

मित्रांनो जर शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर सूर्यास्तानंतर हनुमानाची पूजा करावी आणि त्यानंतर हनुमानजींच्या पूजेमध्ये सिंदूर ठेवावा आणि आरतीसाठी दिवा लावण्यासाठी काळ्या तिळाच्या तेलाचा वापर करा, असे सांगितले जाते. इतकंच नाही तर निळ्या रंगाची फुलेही अर्पण करावी, ती खूप लाभदायक ठरतात आणि यामुळे शनिदेव की आपल्यावर प्रसन्न होतात.त्याचबरोबर शनि देव त्याला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी तुम्ही शनि यंत्र स्थापित करा.

मित्रांनो शनिच्या प्रकोपाने जीवन संकटांनी घेरलेलं असेल तर शनिवारी शनियंत्राची स्थापना करुन त्याची पूजा करावी. एवढेच नाही तर या यंत्राची दररोज पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात. याशिवाय, दररोज शनियंत्रासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि निळे किंवा काळे फूल अर्पण करावे, असे केल्यानेही फायदा होईल. त्याच बरोबर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि या झाडाला सात प्रदक्षिणा घालाव्यात.

त्याचबरोबर या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे गायीची सेवा करणे. मित्रांनो जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही काळ्या गाईची सेवा करा, कारण शनी देवतेला प्रसन्न करण्यासाठी ते खूप शुभ मानले जाते. तुम्ही काळ्या गायीच्या डोक्यावर रोळी लावून तिच्या शिंगाला कलावा बांधून पूजा आणि आरती करा. त्यानंतर गायीची प्रदक्षिणा करुन तिला बुंदीचे चार लाडू खाऊ घालावेत.

त्याचबरोबर आपल्या जीवनातील शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्‍यासाठी शनिवारी काळ्या वस्त्रात काळे उडीद, काळे तीळ आणि लोखंडाची वस्‍तू बांधावी आणि त्यानंतर त्‍याची पूजा करून ते शनीदेवाला अर्पण करावे. त्‍यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्‍यक्तिस काळे वस्त्र आणि त्‍यात गुंडाळलेल्‍या वस्‍तू दान कराव्‍यात. मित्रांनो हे उपाय जर तुम्ही प्रत्येक शनिवारी केल्‍यास काही दिवसातच त्‍याचे सकारात्‍मक फळ मिळण्‍यास प्रारंभ होईल आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील अनेक समस्या देखील
नष्ट होण्यास सुरुवात होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *