कोणत्याही शनिवारी देवघरात ठेवा एक कासव : घरातून सर्व वाईट शक्ती निघून जातील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो जर आपल्या घरामध्ये पैश्यांची जर तंगी असेल, आपल्या घरात जे पैसा टिकत नसेल, किंवा आपल्या घरामध्ये सतत गरिबी आणि दारिद्रय असेल तर आपल्याला ज्योतिषांकडून आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्रानुसार की घरामध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो, मित्रांनो घरातील नकारात्मक शक्ती त्याचबरोबर दारिद्रता घालवण्यासाठी कासव नक्की स्थापित करा असा सल्लाही दिला जातो.
आज आपण शनिवारच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये धातूचा कासव कशा प्रकारे प्रस्थापित करायचा आहे.

आणि त्याचबरोबर या मुळे कोणकोणत्या संकटांपासून आपली सुटका होते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याला जर एकाद्या कामामध्ये यश मिळत नसेल, वारंवार अपयश पदरी पडत असेल, नोकरी मिळत नसेल, तरी सुद्धा हे कासव आपली मोठी मदत करत आणि म्हणून मित्रांनो ज्या घरामध्ये कासव स्थापित केलं जातं त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही असतेच असं समीकरण आहे.

मित्रांनो हे चमत्कारी कासव तुम्ही घरामध्ये स्थापित करता, त्यावेळी कायम स्वरूपी माता लक्ष्मी चा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो. आणि कासव घेत असताना, खरेदी करताना चांदी असेल, तांबे असेल, पितळ असेल, किंवा पंच धातू, किंवा सप्त धातू अश्या वेगवेगळ्या धातूंच कोणत्याही धातूंच खरेदी करू शकता. हे कासव तुम्ही देवघरामध्ये स्थापित करा तुमचा जो हॉल असेल, लिविंग रम असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे कासव स्थापित करू शकता किंवा तुमचा जो उद्योग धंदा आहे, किंवा तुमचे जे दुकान आहे, ऑफिस आहे, त्या ठिकाणी सुद्धा हे कासव स्थापित करता येत.

परंतु मित्रांनो हे कासव देवघरामध्ये स्थापन करताना किंवा ठेवताना खाली एक प्लेट ठेवावे व त्या प्लेट मध्ये हे कासव ठेवावे आणि त्या नंतर पूजा करताना हे कासव पूर्ण पणे पाण्यात बुडेल अश्या प्रकारे ते प्लेट मध्ये ठेवाव. आणि मग आपण पूजा करू शकता. कासव ठेवण्यासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा आहे, कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते, सर्व देवीदेवतांमध्ये कुबेर हे धनाचे देवता म्हणून ओळखले जातात.

आणि म्हणून जर हे कासव उत्तर दिशेला जर तुम्ही कासव ठेवले तर आपल्या घरातील पैश्यांची सर्व समस्या नष्ट होतात. आणि मित्रांनो जर तुम्हाला उत्तर दिशेला हे कासव ठेवता आले नाही तर तुम्ही ते पूर्व दिशेला देखील ठेऊ शकता. पूर्व दिशेला कासव ठेवल्याने आपल्या घरामध्ये आजारपण निर्माण होत नाही. आपल्या घरातील लोकही ज्यास्त आजारी पडत नाहीत आणि मित्रांनो कासव ठेवताना त्या कासवाचे तोंड आपल्या घराकडे होईल याची नक्की काळजी घ्या.

त्याचबरोबर एकदा कासव स्थापित केल्या नंतर त्याची नित्य नियमाने पूजा केली जाईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे कासव स्थापित करताना एखादा शुभ मुहूर्तावर किंवा शक्यतो शनिवारच्या दिवशी स्थापन करावे आणि तिथून पुढे त्याची नित्यनियमाने पूजा करावी, ज्यावेळी आपण देवपूजा करतो, सकाळी आणि सायंकाळी त्यावेळी आपण ह्या कासवाची सुद्धा पूजा करायला हवी, मित्रांनो आपण जे कासवावरती जे पाणी टाकत आहोत, ते पाणी रोजच्या रोज बदलले जाईल याची सुद्धा आपण नक्की काळजी घ्या.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *