नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो, आपल्या सर्वांच्या ओळखीची आणि परिचित आणि सर्वाना विदित असणारी लोकसमजूत म्हणजे दृष्टबाधा होय. ग्रामीण भाषेत यालाच नजर लागणे दृष्ट लागणे म्हणतात. वेद वाड़मयातील अथर्ववेदात याचा संदर्भ दृष्ट व भय उत्पन्न करणारी दृष्टी असा आला आहे आणि या दृष्ट्बाधेवरील उपाय म्हणून काही मंत्रही आलेले आहेत.
त्याच बरोबर भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाला दृष्ट लागण्याचा उल्लेख आढळतो तर महानुभाव साहित्यातही ही समजूत ग्रंथित झाली आहे.अजूनही अनेक धार्मिक परंपरा पाळताना व्यक्तींची, देवतेची ,मूर्तीची विवक्षित पद्धतीने नजर उतरवली जाते. यासंबधी काही गीते गाऊनही दृष्ट उतरवली जाते. अशा गीतांना दृष्टगीत म्हणूनही संबोधण्यात येते..
एखाद्या माणसाची नजर वाईट ,पापी आणि विकार उत्पन्न करणारी असते अशी एक लोकसमजूत समाजजीवनात रूढ आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही ;परंतु पिढ्यानपिढ्या ही लोकसमजुत समाजजीवनात प्रवाहित,संक्रमित होत आली आहे.कोणत्याही आसक्तीने भारलेल्या ,बांधलेल्या एखाद्या व्यक्तीची नजर कोणत्याही वस्तूवर,किंवा व्यक्तीवर ,अथवा लहान बाळावर,नव्या घरावर ,अगर कोणत्याही नजरेत भरणाऱ्या व्यक्ती. प्रसंग,घटना ,वस्तू इत्यादीवर पडल्यास त्या व्यक्तीला अगर त्या वस्तूला ती नजर बाधते असे मानले जाते.
अशी नजर लागल्यास ,बाधल्यास त्या व्यक्तीच्या दैनदिन जीवनावर विपरित परिणाम होतो.त्या व्यक्तीला शारीरिक वेदना आणि,पिडेलाही सामोरे जावे लागते उदा. .तीव्र डोकेदुखी ,ताप येणे,उलटी होणे,मानसिक संतुलन बिघडणे ,इत्यादी मानसिक व शारीरिक परिणाम अशा वेळेस संभवतात अशी याबाबत लोकमानसात धारणा आहे.विशेषतः लहान मुले,पाळीव दुभती जनावरे,सुंदर स्त्री-पुरुष ,मौल्यवान दागिने वस्तू,सुंदर वास्तू,शेतातील पाण्याचे स्त्रोत विहीर,आड इत्यादीनां दृष्ट्बाधा होते अशी सार्वत्रिक लोकसमजूत आहे.
मित्रांनो, आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती बरोबरच आपल्या घराला सुद्धा नजर लागण्याची शक्यता असते, मग अशा वेळी आपण आपल्या वास्तुशास्त्राचे मदत घेऊन काही उपाय आपल्या घराला लागलेली नजर किंवा दृष्ट यांच्यापासून आपल्या घराचे संरक्षण करू शकतो. मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीच्या वाईट नजरेने मुळे किंवा नकारात्मक गोष्टीमुळे जर आपल्या घराला नजर दृष्ट लागली असेल तर यामुळे घरात वाद विवाद होण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर घरातील व्यक्ती आजारी पडण्यास सुरुवात होते.
म्हणूनच यावर वेळीच उपाय केल्या यापासून भविष्यामध्ये जो त्रास आणि अडचणी येणार आहे यापासून आपण आपल्या घराची व घरातील व्यक्तींची सुटका करू शकतो.
मित्रांनो, आपल्या घराला जर नजर लागली असेल आणि
त्यामुळे घरात वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतील तर यासाठी आज आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी दुपारच्या वेळी स्वयंपाक करत असताना करायचा आहे.
मित्रांनो, का शनिवार या दिवशी दुपारच्या वेळी तुम्ही घरामध्ये जो काही स्वयंपाक केलेला मग ते चपाती भाजी आमटी भात यापैकी कोणतीही गोष्ट असेल, त्यांमधील थोडा थोडा भाग तुम्हाला एखाद्या चपातीवर घ्यायचा आहे
आणि त्यानंतर ती चपाती कागदामध्ये बांधून आपल्या घरातून बाहेर यायचं आहे आणि ती चपाती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे सात वेळा ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही चपाती लगेच तुम्हाला जायला कुत्र्याला खाऊ घालायची आहे.
मित्रांनो तुमच्या घराला वाईट नजर दृष्ट लागली असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरा मध्ये करू शकता यामुळे तुम्हाला काही दिवसांमध्ये याचा चांगला परिणाम दिसून येईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.