घरात भरभराटी येण्यासाठी,व्यवसायात यश मिळवण्यासाठी : बुधवारी करा ‘हा’ उपाय

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की बुधवार हा गणपती बाप्पाचा वार आहे आणि म्हणूनच आपल्यातील बरेचजण बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची अगदी मनापासून पूजा करत असतात आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्राचे मदत घेऊन अनेक प्रभावी आणि वेगवेगळे उपाय आपल्या घरामध्ये करून गणपतीला प्रसन्न करून घेण्याचा आणि आपल्या कामामध्ये यश मिळवण्याचा त्याचबरोबर आपल्या घरातील गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.

त्याचबरोबर आपल्यावर जर गणपती बाप्पा प्रसन्न झाले तर यामुळे आपल्या सर्व समस्या सुटतील आणि त्यामुळेच आपल्या नोकरीमध्ये आणि त्याचबरोबर व्यावसायामध्ये ही वाढ होइल आणि आपली पैशा संबंधित सर्व अडचणी दूर होतील. मित्रांनो बुधवार हा दिवस गणपतीचा वार असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. म्हणून या दिवशी गणपतीची आराधना करायची म्हणजे या दिवशी आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करणे फलदायी ठरेल, आपण आपल्या सोयीप्रमाणे पाठ करू शकता किंवा म्हणू शकता.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला दूर्वा अर्पित कराव्या आणि त्याचबरोबर आपल्या सामर्थ्यानुसार मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा, कारण मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाला दुर्वा आणि मोदक अत्यंत प्रिय आहे म्हणून आपण बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा आणि मोदक नक्की अर्पण करा.

त्याचबरोबर मित्रांनो बुधवारी काही पैसे किन्नर अर्थात तृतीय पंथींना दान म्हणून द्यावा. नंतर त्यातून काही पैसे आशीर्वाद स्वरूप त्याच्याकडून पुन्हा घेऊन स्वतःजवळ ठेवावे. नंतर हे पैसे पूजा स्थळी ठेवून पूजा करून त्याला धूप उदबत्ती दाखवून त्यांना हिरव्या कपड्यात गुंडाळून घ्यावे. आता हे तिजोरी किंवा कपाटातील लॉकरमध्ये ठेवावे. किंवा आपण धन ठेवत असलेल्या ठिकाणी हे पैसे ठेवावे. याने भरभराटी येत.

त्याचबरोबर जर तुमच्या घरा मध्ये पैशात संबंधित वारंवार अडचणी निर्माण होत असतील तर अशा वेळी आपण एक तांत्रिक टोटका करू शकतो हा उपाय करत असताना या दिवशी अख्ख्या कवड्या आणाव्या. या कवड्या पूजन सामुग्री मिळत असलेल्या दुकानात सहज मिळतात. यासोबत एक मूठभर हिरवे अख्खे मूग घेऊन दोन्ही वस्तू एका हिरव्या कपड्यात बांधाव्या. आता हे गुपचुप जाऊन एखाद्या मंदिराच्या पायर्‍यांवर ठेवून यावा. पण विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे याबद्दल चर्चा करू नये.

परंतु मित्रांनो हा उपाय केल्यानंतर हा उपाय करत असल्याचे कुणालाही सांगू नये, परंतु याचबरोबर हा उपाय करताना मनात श्रद्धा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बुधवारच्या दिवशी कर्ज मुक्ती साठी आणि त्याचबरोबर पैशांच्या अडचणी संबंधित आणखीन एक सोपा उपाय आपण आपल्या घरामध्ये करू शकतो,बुधवारी सव्वा पाव मूग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गायीला खाऊ घालावी. हा उपाय केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. कर्जामुळे परेशान व्यक्तीने हा उपाय नक्की करून बघावा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *