नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीनुसार दर दिवशी कोणत्या ना कोणत्या देवताची पूजा केली जाते. सोमवारी शंकराची तर मंगळवारी हनुमानाची पूजा करतात. त्याचप्रमाणे सगळ्या देवताची पूजा करण्याच्या पद्धतीही वेगळ्या असतात. तसेच देवताची पूजा किंवा आराधना करताना वेगळे उपायही असतात. तसे उपाय केल्याने जीवनातील दुःख दूर होतात. सर्वानाच माहिती आहे की मंगळवार हा सर्वांत शुभ आणि कल्याणाकारी दिवस असतो. जो कोणी भक्त हनुमानाची मनापासून पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात सारखे अडथळे येत असतील किंवा शारिरीकदृष्ट्या तुम्ही कमी असाल अस तुम्हांला जर का वाटत असेल तर मंगळवारी हनुमंताची पूजा करायला विसरु नका..
मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दररोज वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये खूप दुःखे आणि अडचणी असतील तर जीवनातील दुःख दूर करण्यासाठी मंगळवारी पिंपळाच्या झाडाची ११ पानं घ्या. पानांना चांगली धुवून घ्या.त्यानंतर पानांवर हळदी कुंकवाने राम असे लिहा. पानांवर लिहून झाल्यानंतर मंदिरात जाऊन ते हनुमानावर वाहावे. ती पाने हनुमान यांना वाहिल्यानंतर तुम्हाला मनापासून त्यांच्याकडे तुमच्या जीवनातील अडचणी व दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे.
त्याचबरोबर मित्रांनो दर मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमंताला बनारसी पान वाहावे. असे केल्यास हनुमानाची कृपा तुमच्यावर अखंड राहते आणि त्यामुळे तुम्ही करत असलेल्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला यश मिळण्यास सुरुवात होईल आणि त्याचबरोबर तुमची सर्व कामे मनासारखी होतील.
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मा मध्ये आमदार मला खूप महत्व आहे म्हणूनच जर आपण मंगळवारच्या दिवशी लाल रंगाचा वस्त्र, कोणताही लाल रंगाचे फळ, लाल रंगाची मिठाई गरीब व गरजू व्यक्तींना दान करावे आणि त्याचबरोबर या सर्व वस्तू गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवावीत यामुळे श्री गणेश तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे तुम्ही करत असलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला श्री हनुमंत यांना प्रसन्न करून घ्यायचे असेल आणि त्याचबरोबर हनुमंताला जर का तुम्हांला खूश करायचे असल्यास मंगळवारी तांबे, सोने, केशर, कस्तुरी, गहू, लाल गुलाब आणि शेंदूर दान करावे. या वस्तू दान केल्यास शरीरातले सर्व आजार दूर होतात आणि मानसिक त्रासांपासून मुक्तता मिळते आणि त्याच प्रमाणे आपल्यातील ज्या लोकांना शनीचा त्रास असतो. त्या लोकांनी काळे उडीद आणि कोळसा असे एकत्र बांधून त्यात १ रुपया ठेवावा. एकत्र बांधलेल्या या वस्तूंनी नजर काढावी. आणि ते नदीत फेकावे. त्यानंतर हनुमानाच्या मंदिरात जाऊन राम नावाचा जप करावा.
मित्रांनो अशाप्रकारे हा उपाय जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी केला तर यामुळे शनी देव आणि अनुमान हे दोघेही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील शनि दोषी ही कमी होईल आणि याचप्रमाणे अडचणी कमी होतील त्याचबरोबर तुम्ही करत असलेल्या कामामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.