नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीनुसार मंगळवारचा दिवशी हनुमानजींना समर्पित असतो. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होतं. अशी मान्यता आहे की मंगळवारी पूजा केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आपल्या भाविकांच्या इच्छा पूर्ण करतात. हनुमानजींना संकट मोचकही म्हटलं जातं. हनुमानजी भगवान श्रीरामाचे सर्वात मोठे भक्त आहेत. हनुमानजी हे महादेवाचे अवतार असल्याचं मानतात. हनुमानजी यांची पूजा केल्याने जीवनात येणाऱ्या समस्यांमधून मुक्तता मिळते.
म्हणूनच मंगळवारच्या दिवशी आपल्याला हनुमान यांची विशेष पूजा देखील केली पाहिजे की पूजा करत असताना
हनुमानजी यांची पूजा विधीवत केली पाहिजे. हनुमानजी यांची पूजा मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी करणे विशेष लाभदायक मानलं जातं. असं केल्याने पूजेचा पूर्ण लाभ प्राप्त होईल. मंगळवारच्या दिवशी उपवास ठेवल्याने हनुमानजींचा आर्शीवाद प्राप्त होतो. हनुमानजींची पूजा सकाळी स्नान करुन मग करावी. हनुमानजींच्या पूजेत स्वच्छता आणि नियमांचं विशेष पालन केलं पाहिजे. त्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घ्यावी.
मित्रांनो मंगळवारच्या दिवशी लवकर उठून स्वच्छ स्नान करून तुम्हाला आपल्या देवघरामध्ये किंवा जर तुमच्या घरात शेजारी हनुमान यांची मंदिरे असेल तर तिथे जाऊन हनुमान चालीसाचं पठन हनुमानजींच्या मूर्ती किंवा फोटो समोर करावं, तसेच एका पात्रात गंगाजलचे काही थेंब मिसळून ठेवा, पूजेनंतर हे जल प्रसाद म्हणून ग्रहण करा.
हनुमानजींच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यानंतर चोला अर्पण करावा कारण हनुमानजींना मंगळवारीला चोला अर्पित केल्याने ते अधिक प्रसन्न होतात, त्याचबरोबर या दिवशी हनुमान यांना लाडू, गुळ आणि चण्याचा प्रसाद दाखवा कारण हे पदार्थ हनुमान यांना खूप प्रिय आहेत.
त्याचबरोबर सर्वात शेवटी पूजा समाप्त झाल्यावर याला प्रसाद म्हणून ग्रहण करा.
त्याचबरोबर मित्रांनो मंगळवारी हनुमान जी यांना प्रसन्न आणि खूश करण्यासाठी आपण एका विशेष मंत्राचा जप या दिवशी देव पूजा करत असताना करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,
“ॐ श्री हनुमंते नम:”
मित्रांनो हनुमानजींच्या पूजेत नियमांचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी अस्वच्छतेपासून दूर राहा. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. म्हणूनच किमान मंगळवारच्या दिवशी तरी आपल्या मनात चुकीचे विचार येऊ देऊ नका त्याचबरोबर या दिवशी क्रोध आणि लोभापासून दूर राहा आणि या दिवशी कुणाचा अपमान आणि अनादर करु नये. मित्रांनो त्याच बरोबर या दिवशी कोणालाही पैसे उधार म्हणून किंवा कर्ज होणार घेऊ नये.
त्याचबरोबर मित्रांनो मंगळवारच्या दिवशी आपण उडीद डाळीचे सेवन करणे टाळायचे आहे कारण मंगळवारच्या दिवशी उडदाची डाळ खाल्ल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू नये कारण हेही आपल्या शास्त्रानुसार अशुभ मानल जात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेजला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.