सोमवारच्या दिवशी अशी करा महादेवाची पुजा : सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो सोमवारचा दिवस हा शंकर देवाचा असतो. या दिवशी जो कोणीही शंकराची मनापासून आराधना केल्यास त्याच्या मनासारख्या गोष्टी होतात. शंकर आपल्या भक्तांसाठी लवकर प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना भोलेनाथ ही म्हटले जाते. शंकर नेहमी आपल्या भक्तांवर आशिर्वांदांचा वर्षाव करतात. त्यात तुम्हांला जर दुःख आणि संकटांनी घेरले असेल तर सोमवारी शंकराची पूजा करायला विसरू नका.

मित्रांनो सोमवारच्या दिवशी सर्वात आधी लवकर उठून
अंघोळ करून शंकराची पूजा करावी. सोमवारच्या दिवशी शंकराला खासकरून चंदन , शंख, बेल, धोत्रा वाहावे. शंकराच्या या सर्व गोष्टी आवडत्या आहेत. या गोष्टींमुळे शंकर लवकर प्रसन्न होतात. मित्रांनो त्यामधील सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे तांदुळ, म्हणूनच सोमवारी भोलेनाथला तांदूळ अर्पण करावे. त्यामुळे लोकांच्या जीवनात धनाचा वर्षाव होतो आणि गरीबी दूर होते.

मित्रांनो जर तुम्हांला तुमच्या आयुष्यातील पाप नष्ट करायचे असल्यास शंकराला तीळ वाहायला विसरू नका. घर आणि जीवनात सुख समुद्धी आणण्यासाठी जवस अर्पण केले पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला संतान प्राप्ति साठी काही उपाय करायचा असेल तर सर्वात आधी तुम्ही शंकर देवाला गहू अर्पण करावे, मित्रांनो सोमवारच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरा मध्ये जाऊन महादेवांना प्रार्थना करून भगवान पण केले तरी यामुळे तुमची संतानप्राप्ती ची समस्या नष्ट होईल.

मित्रांनो सुखाचा मार्ग दाखविणा-या या देवाची उपासना करण्याचा शुभ दिन म्हणजे सोमवार. या दिवशी केलेली भोळ्या शंकराची पूजा अनेक मनोकामना पूर्ण करणारी ठरते. त्यासाठी महादेवाच्या पूजा तीन विशेष उपाय आणि शिवमंत्रासोबत पूर्ण केली तर तुमचा भाग्योदय अर्थात मनपसंत जोडीदार, नोकरी, व्यवसायातील प्रगती किंवा तुम्ही केलेल्या संकल्पापर्यंत जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

त्याचबरोबर मित्रांनो सोमवारच्या दिवशी स्नान झाल्यानंतर शिवलिंगाला विशेषतः गाईचे दूध अर्पण करावे. यामुळे तन, मन आणि धन यात निर्माण होणा-या कलहांची शांती होईल. महादेवाला मधाची धार अर्पण करावी. अशी धारणा आहे की, त्यामुळे आयुष्यातील नोकरी आणि त्याचबरोबर व्यवसायासंबधीच्या समस्यांचा अंत होतो,त्यानंतर जल स्नान करुन महादेवाला लाल चंदन लावावे किंवा श्रुंगार करावा. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मानुसार चंदनाचा गुणधर्म शितलता हा आहे. त्यामुळे अशी धारणा आहे की, शिवाला चंदन चढविल्याने आयुष्यातही शांती आणि सुख-समृद्धी नांदते.

मित्रांनो सोमवारच्या दिवशी शंकराची पूजा करत असताना सर्वात अधिक शंकरांना किंवा शिवलिंगाची स्थापना जर तुम्ही तुमच्या घरा मध्ये केली असेल तर तिला अभिषेक घालावा आणि त्यानंतर गंध, अक्षता, फुल, नैवेद्य दाखवावा आणि पूजा करावी. यासोबतच शिवलिंगाला अर्पण केलेल्या दूध आणि मधाच्या चरणामृताचा प्रसाद ग्रहण करावा आणि भाळी चंदन लावून मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी.

Leave a Reply

Your email address will not be published.