नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रमैत्रिणींनो, आपल्या वास्तुशास्त्रानुसार सोमवारी काही कार्य कारण अत्यंत शुभ असते तर काही कार्य अत्यंत अशुभ मानले जाते. सोमवारच्या दिवशी अशी अशुभ काम केल्याने आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. बाधा निर्माण होतात. मित्रांनो सोमवार हा दिवस शिव शंकरां प्रमाणे चंद्रदेवांचाही वार आहे. हिंदू धर्म शास्त्रा नुसार जी व्यक्ती सोमवारच्या दिवशी भक्ती भावाने भगवान शिव शंकराची पूजा करते. त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्ट पासून अवश्य मुक्ती मिळते. सोमवारचा व्रत करतात. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्ती होते.
सोमवारी नक्की काय करावे आणि काय नाही याची माहिती आपल्याला असलीच पाहिजे कारण सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. भोलेनाथ हे भोळे आहे. छोट्याश्या पूजेने भक्तांवर प्रसन्न होतात. आणि सर्व प्रकारच्या मनोकामना पुर्ण होतात. त्यांच्या जीवनातील कष्ट दूर करतात. मित्रांनो सोमवारच्या दिवशी काही कार्य अवश्य करा.
पहिली गोष्ट सोमवारी सकाळी लवकर उठून आपण स्नान केल्यावर शिव चालीसाचा पाठ अवश्य करा. शिव चालिसाचा पाठ जी व्यक्ती दर सोमवारी करते. त्या व्यक्ती वर शिव शंकर यांची कृपा बरसते. भगवान भोलेनाथ त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात. याही पेक्षा जी व्यक्ती सोमवारचा व्रत करतात. अशा व्यक्ती च्या जीवनात सर्व प्रकारच्या इच्छांची पूर्ती होते. मात्र पूर्ण श्रध्देने आपण हे व्रत करायला हवे त्याचबरोबर मित्रांनो सोमवारच्या दिवशी भस्म अवश्य लावा. भस्माचा तिलक करा. अस केल्याने शिव कृपा आपल्यावर आपल्या पूर्ण कुटुंबावर बरसते.
मित्रांनो भगवान शंकराच्या मूर्ती समोर आपण एक दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे. शिवलिंग समोर एक दिवा नक्की प्रज्वलित करा आणि जर तुमच्या घरा शेजारी शिव मंदिर असेल तर एक दिवा नक्की लावा. शिव शंकराचे दर्शन नक्की घ्या. आपण जर एखादी गुंतवणूक करणार असाल. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणार असाल शेअर मध्ये गुंतवणूक करणार असाल. सोने चांदी खरेदी करणार असाल तर सोमवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी आपण आपल्या घराचे बांधकाम करू शकता. हे झाले सोमवारी नक्की काय करायचे. सोमवारी अशा गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये. महत्व पूर्ण कामासाठी जाणार असाल हे आपल्या उत्तर दिशेला, पूर्व दिशेला किंवा आग्नेय दिशेला असेल महत्वाचं काम या तीन दिशेला असेल या दिशेला प्रवास करावा लागत असेल तर सोमवारी नक्की टाळा. हे काम अयशस्वी होण्याची शक्यता असते. सोमवारच्या दिवशी सफेद रंगाच वस्त्र किंवा दुधाच दान चुकूनही करू नये.
सोमवारी विशिष्ट तिथी असेल एकादशी असेल पौर्णिमा असेल त्या तिथी संबंधित सोमवारी सफेद वस्त्रांचे दान असेल दुधाचे दान असेल तर अवश्य करू शकता. त्याबाबत मनात शंका आणू नका. सोमवारच्या दिवशी आपण मांस मदिरा मांसाहार सेवन करू नका कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका. कोणत्याही व्यसनापासून आपण दूर राहावं. जर आपण व्रत केलेले असेल उपवास करत असाल सोमवारचा तर यादिवशी संबंध ठेवणे सुद्धा आपण टाळावं. सोमवारच्या दिवशी आपण कोणाचाही अपमान व कोणालाही अपशब्द बोलू नये. मन दुखावू नये. दुपारी झोपणे टाळावे.
त्याचबरोबर मित्रांनो सोमवारी ज्यांनी व्रत केलं आहे, अशा व्यक्तींनी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे लांब कुशी घेणे दुपारी झोपणे अत्यंत चुकीचं मानल जात आणि त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी लांबचा प्रवास करूनही आपल्या शास्त्रांमध्ये अशुभ मांनल गेलं आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.