नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्यातील प्रत्येकाच्या मनात धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा असते. पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ पैश्यांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे मानवी जीवनात धनसंपत्तीला खूपच महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकते. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. म्हणूनच यादिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते.
मित्रांनो आज आपण शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत आणि हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि आपल्या घरातील धनसंपत्ती वाढ होण्यास सुरुवात होईल.
मित्रांनो लक्ष्मी मातेच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते.त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महलक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे. संध्याकाळी गोधुली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा.हळदीकुंकू लावून पूजा करावी तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फुल अर्पण करावे.दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा नैवेद्य दाखवावा.शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी.या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्म शास्त्रामध्ये लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व दिले जाते. श्री यंत्र, महालक्ष्मी यंत्र, धन वर्षा यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र आणि लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्या प्रमाणे या यंत्रांच्या प्रभावाने तुमच्या धन संपत्तीत वाढ होते तसेच सुखप्राप्तीसुद्धा होते.
मित्रांनो जर तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्यात ताम्रपत्र,रजतपत्र किंवा भूर्जपत्र यावर श्री यंत्र बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा करू शकता.प्राणप्रतिष्ठा केल्यावर या यंत्राची नियमितपणे पूजा करावी.तसेच शुक्रवारी श्रीयंत्राच्या पूजेनंतर दाखवण्या साठीचा नैवेद्य घरीच तयार करावा.
मित्रांनो जर लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानले जाते. त्याचबरोबर आपल्या शास्त्रानुसार पृथ्वीतलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेर देव करत असतात. कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात.त्यामुळे आपल्या घरातील देव्हाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.त्यांची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो.
अशाप्रकारे कुबेर देवाची स्थापना आणि पूजा करणे हादेखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. मित्रांनो हे उपाय जर आपण शुक्रवारच्या दिवशी केले तर यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आणि त्यामुळे आपल्या घरातील धनसंपत्ती वाढ होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.