नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असत. गुरु भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह मानला जातो. पत्रिकेत गुरुची स्थितीचा प्रभाव वैवाहिक जीवनावर देखील होतो. गुरु जर शुभ स्थितीत असेल तर भाग्याचा साथ मिळतो आणि नवरा बायकोत प्रेम सदैव कायम राहत. मित्रांनो आपल्या कुंडलीतील किंवा पत्रिकेत गुरुशी संबंधित एखादा दोष असेल तर त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते.
गुरु ग्रहाचे शुभ फल मिळवण्यासाठी गुरुवारी कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला गुरूवारच्या दिवशी गुरुशी निगडित पिवळ्या रंगाच्या कपड्यांचे किंवा वस्त्रांचे दान कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला करायचे आहे यामुळे तुमच्या राशीतील गुरु ग्रह चांगल्या स्थितीत राहील. मित्रांनो तुम्ही गुरूवारच्या दिवशी पिवळ्या वस्त्रांत बरोबरच पिवळ्या वस्तूंचीही दान करू शकता, पिवळ्या वस्तू म्हणजे सोनं, हळद, चण्याची डाळ किंवा कोणत्याही फळांचे इत्यादी.
त्याचबरोबर मित्रांनो आपण जर प्रत्येक गुरुवारी महादेवाला बेसनाच्या लाडवांचा प्रसाद अर्पण केले किंवा त्याचा नैवेद्य दाखवला तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु ग्रहाचे दोष दूर होतात. गुरुवारी गुरु ग्रहासाठी व्रत ठेवायला पाहिजे.
मित्रांनो त्याचबरोबर गुरूवारच्या दिवशी बृहस्पतीच्या प्रतिमेला पिवळ्या वस्त्रावर विराजीत करा आणि त्याची पूजा करा. पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल आणि प्रसादासाठी पिळवे पक्वान्न किंवा फळ अर्पित करावे.
गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करावे आणि त्याच बरोबर या दिवशी अळणी भोजन करावे. भोजनात पिवळ्या रंगाचे पक्वान्न जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळी इत्यादी सामील करावे. मित्रांनो वरील उपाय केल्यानंतर आपण गुरूवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी गुरु मंत्राचा जप करावा, तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, ॐ बृं बृहस्पते नम:। मंत्र जपाची संख्या किमान 108 असायला पाहिजे.
मित्रांनो त्याच बरोबर आपण गुरुवारी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे आणि त्यानंतर स्नानादी करून विष्णूच्या समोर दिवा लावायला पाहिजे आणि गुरुवारी संध्याकाळी केळीच्या वृक्षाखाली दिवा लावायला पाहिजे, गरीब मुलांना केळीचे दान करावे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.