नशीब खराब असेल आणि साथ देत नसेल, तर दररोज बोला ‘हा एक मंत्र!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो जर तुम्हाला ही तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल, तुमची काम पूर्ण होत नसेल किंवा तुमच्याकडच्या किंवा तुमच्या घरातील पैसा टिकत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय अगदी सोपा आहे हा उपाय करत असताना आपल्याला एका प्रभावी मंत्राचा जप आपल्या देवघरात समोर बसून अगदी मनापासून करायचा आहे, मित्रांनो रोज बोला हा मंत्र तुमचे नशीब बदलेल, तुमचे नशीब चमकेल आणि नशिबाची साथ तुम्हाला मिळू लागेल तुमची सगळी कामं पूर्ण होतील. यश लाभेल आणि पैसा सुद्धा टिकायला लागेल.

मित्रांनो मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना बद्दल अनेक वेळेस काय होतं की, आपल्या घरामध्ये काही ना काही दोष असतात किंवा आपल्या पत्रिकेत काही दोष असतात. काही लोकांना माहित असतं की, आमच्या पत्रिकेत हे दोष आहे, ते दोष आहेत. पण काही लोकांना माहीत नसतं की, आमच्या पत्रिकेत काही दोष आहेत की नाही. पण सगळ्या पत्रिकांमध्ये दोष असतात असं नाही.

काही पत्रिकेमध्ये काही ना काही एक दोन छोटे-मोठे दोष असतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. आणि आपली कामसुद्धा पूर्ण होत नाही. आपण पैसा तर कमवतो पण महिनाभर तो पैसा पुरत नाही बचत होत नाही. आणि मग कोणतेही कामे किंवा कोणतेही स्वप्न कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही. काहीच आपण घेऊ शकत नाही.

तर यासाठी आपल्याला नशिबाची साथ हवी असते आणि यासाठीच हा मंत्र रोज तुम्हाला तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये बसून 21 वेळेस बोलायच आहे. सकाळी बोलू शकतात किंवा संध्याकाळी बोलू शकतात. कोणत्याही एका वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. मित्रानो तुम्हाला माहीत असेल की आपल्या पत्रिकेमध्ये नऊ ग्रह असतात.

त्यापैकी एक सुद्धा ग्रह उलटा सुलटा किंवा त्याच्या दिशा भटकल्या किंवा तो नाराज असला तर आपल्याला त्या नऊ ग्रहांना प्रसन्न करावे लागते. तरच आपली पत्रिका व्यवस्थित काम करते आणि आपल्याला नशिबाची साथ मिळते. त्यासाठी खास करून एक नवग्रहस्तोत्र आहे आणि एक नवग्रह मंत्र आहे. तर आपण स्तोत्राबद्दल नंतर बोलूयात. दुसऱ्या कोणत्याही माहितीमध्ये पण आज आपण तुम्हाला सांगणार आहे सोपा सरळ नवग्रह मंत्र.

हा नवग्रह मंत्र तुम्हाला रोज 21 वेळेस बोलायचं आहे. हा मंत्र तुम्ही दररोज म्हणण्यास सुरुवात केली तर यामुळे तुमचे नवग्रह प्रसन्न होतील, त्याचबरोबर तुमचे नशीब तुम्हाला साथ देण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडण्यास सुरुवात होईल. मित्रांनो चला तर मग जाणून घ्याव्यात कोणता आहे हा प्रभावी मंत्र आपल्याला दररोज देव पूजा झाल्यानंतर 21 वेळा आपल्या देवघरामध्ये बसून म्हणायचा आहे.
मित्रांनो तो प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहे,

ॐ ब्रह्मा मुरारी त्रीपुरांतकारी भानुः शशि भूमि सुतो बुद्धश्च |
गुरूश्च शुक्र शनि राहु केतव सर्वे ग्रहा शांति करा भवंतु ||

मित्रांनो सगळ्या ग्रहांना शांत करण्यासाठी हा मंत्र आहे. सकाळच्या वेळी देव पूजा झाल्यानंतर किंवा देवपूजा करत असताना तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे परंतु हा मंत्र तुम्ही सावकाश हळुवारपणे एक-एक शब्द हळुवारपणे बोलत हा मंत्र जप करायचा आहे. 21 वेळेस हा मंत्र बोलायचं आहे. नक्कीच तुमचे नवग्रह प्र स न्न होतील आणि कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही नशिबाची साथ तुम्हाला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *