घरात पैसे टिकत नाहीत? : करा फक्त ‘हा’ सोपा उपाय : भरपूर पैसा साठेल

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

पैसा कितीही कमावला तरी महिनाअखेर ओढाताण असतेच. काही केला पैसा टिकतच नसतो. तर मित्रांनो घरात पैसा टिकावा यासाठी काही रोजच्या जीवनात सोपे उपाय करून आपण या गोष्टीवर मात करू शकतो.

मित्रांनो चला तर बघूया कोणता आहे हा उपाय :
पैसे घेताना नेहमी उजव्या हाताने देण्यास सांगून आपण उजव्या हातानेच घ्यावे. पैसे मोजताना नोटाला थुंकी लावून मोजू नये लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते पोथीची पाने, ग्रंथाची पाने थूंकी लावून उलटू नयेत अशुभ असते.

रविवारी हातापायाची नखे कधीही कापू नयेत वा घरात सांडू नयेत त्याने दारिद्र्य येते. नखे मंगळवारीच कापावीत. कापलेली नखे एका पुडीत बांधून कुत्रे जाणार नाहीत अशा ठिकाणी टाकावीत. लक्ष्मी घरात स्थिर राहते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी रोज किमान 108 वेळा करावा करावा. घरातील कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार वेळा जप करावा.

लक्ष्मी प्राप्तिचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे.
आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे, वह्या, खतावणी इत्यादींवर अष्टगंध लावा. श्री किंवा शुभ लाभ असे लिहावे. आर्थिक व्यवहारात यश मिळते.

हातात रोख रक्कम पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावे. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.

गुरुपुष्यामृत योगावर सराफांकडून किमान एक ग्रॅम सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन विकत आणावे. पुरेसे सोने जमा झाले की पत्नीला एखादा दागिना करावा. असे सोने खरेदी करण्याचे कारण की ते विकायची पाळी कधीच येणार नाही. लक्ष्मी घरात स्थिर राहते.

मित्रांनो, घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशामध्ये थोडेतरी पैसे ठेवावेत. रिकाम्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये कारण पैसा पैशाकडे चालतो येतो. हे शाश्वत सत्य आहे.

घराच्या खोलीमध्ये तिजोरी ठेवली असेल त्या खोलीच्या भिंतींचा रंग काळा, लाल अथवा निमा नको. तो पिवळाच असावा.लक्ष्मी प्राप्तीचे इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे. दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे. त्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते.

जो मळकट कपडे घालतो ,दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदय व सूर्यास्त समयी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते.

लक्ष्मीच्या साधकांनी लोकरीचे वा रेशमाचे पिवळ्या रंगाचे आसन बसण्यासाठी वापरावे. कपाट – तिजोरीवर जाळे, पत्रा, भंगार माल ठेवू नये.

घरात लक्ष्मीचा वास पाहिजे असल्यास प्रवेशद्वारासमोर पायऱ्या किंवा उंबरठ्यावर कुंकवाची पावले काढावीत.

मित्रांनो, लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करीत आणि परत जायचे नाव केला नाही
आपण समुद्र किनारी, नदी किनारी फिरायला जातो त्या वेळी जलदेवतैची प्रार्थना करून एक श्रीफळ अर्पण करावे. हळद-कुंकू अर्पण करावे. तत्काळ नफा हेच त्याचे सूत्र असेल हे होते लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे उपाय.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे त्याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *