१२ फेब्रुवारी जया एकादशी, हळकुंडाचे उपाय नक्की करा : करोडपती बनाल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो २०२२ मध्ये १२ फेब्रुवारी रोजी माघ शुक्ल एकादशी असून, या एकादशीला जया एकादशी म्हणून संबोधले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते, पाप-कष्टापासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात. हे व्रत नियमाने केले तर जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी पूजेच्या वेळी जया एकादशी व्रत कथेचे विशेष पठण केले जाते. त्याचबरोबर एकादशी तिथीचा प्रारंभ शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजून ५२ मिनिटानीहोणार आहे आणि एकादशीची समाप्ती शनिवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजून २७ मिनिटापर्यंत आहे.

मित्रांनो जर आपण या दिवशी उपसणे बरोबरच काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतील आणि त्याचबरोबर आपल्या घरातील गरीबी सुद्धा निघून जाण्यास मदत होते. आज आपण आपल्या वास्तुशस्त्रातील एक प्रभावी उपाय पाहणार आहोत. हा उपाय करत असतात आपल्याला ५ हाळकुंडाची गरज लागणार आहे.

मित्रांनो जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग आहार असो वा धार्मिक किंवा मांगलिक कार्य, हळद वापरली जाते. मसाल्यात हळदी वापरल्याने खाण्याची रंगत वाढते तसेच हळद औषधी म्हणून देखील अत्यंत उपयोगी आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे देखील हळदीचे अनेक उपाय आहेत. हळदी वापरून अनेक ग्रहीय समस्या सोडवता येऊ शकतात. हळदीच्या पिवळ्या रंगाला बृहस्पती ग्रहाशी जोडून बघितलं जातं. म्हणून जातकाच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबुती प्रदान करण्यासाठी हळद वापरली जाते. तसेच जीवनात धनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी हळद वापरावी.

गाठ असलेली हळद पिवळ्या दोर्‍यात बांधून आपल्या बाजूला किंवा गळ्यात घालावी. कोणत्याही गुरुवारी या प्रकारे हळद धारण केल्याने शुभ फल प्राप्ती होते त्याच बरोबर या उपायामुळे धन संबंधी समस्या सुटते. त्याचबरोबर तसेच विवाहात अडचण येत असल्यास अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून त्या पाण्याने अंघोळ करावी. या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळलेल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देत असलेल्या लोट्यावर हळद लावावी आणि अर्घ्य देण्यानंतर तिच हळद आपल्या कपाळावर आणि गळ्यावर लावावी याने सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग बनतात.

तसेच इतर लोकं देखील अंघोळीच्या पाण्यात हळद मिसळू शकतात. याने तेज वाढतं आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. याने कोणाची वाईट दृष्टीचा आपल्यावर प्रभाव पडत नसतो. तसेच घरात वाद होत असतील, अनावश्यक कटकट होत असल्यास घरात मांगलिक कार्य आणि हवनात हळद वापरणे योग्य ठरेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी हळदीचे तिलक केल्याने कामात यश मिळतं.

आता काळी हळदीचा उपाय जाणून घ्या ज्याने दुर्भाग्य दूर होतं. धन संचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीत काळी हळद, नागकेशर आणि कुंकू ठेवून त्याला देवी लक्ष्मीच्या पायांच्या स्पर्श करवावा. नंतर धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावं. आपण चांदीच्या डबीऐवजी इतर चांगल्या धातूची डबी देखील वापरू शकता.

मित्रांनो जया एकादशी दिवशी एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, चांदी का शिक्का ठेवून त्याला पिवळ्या दोर्‍याने बांधावे. तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवावे.
एक उपाय असा देखील आहे की एखाद्या शुभ मुहूर्तात काळी हळद कुंकू एका जागी ठेवून त्याची पूजा करावी नंतर ही सामुग्री एक-दोन शिक्क्यांसह लाल रंगाच्या कपड्यात बांधून लॉकर मध्ये ठेवावी. याने धन संबंधी समस्या दूर होतात.

व्यवसाय किंवा नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवार पिवळ्या रंगाच्या कपड्यात काळी हळद, ११ वेळा अभिमंत्रित गोमती चक्र,११ वेळा अभिमंत्रित धनदायक कोड्या बांधून १०८ वेळा विष्णू मंत्र जपत धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. याने नोकरी किंवा व्यवसायात निश्चित प्रगती होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.