घरात ठेवा स्वामींची आवडती ‘ही’ वस्तू, घरात भरभराट होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्यातील बरेच जण या दिवशी स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरूवारच्या दिवशी स्वामींची पूजा करत असतात यामध्ये हे लोक सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जातात आणि आपली देवघरातील दररोजची पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात यामध्ये प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेला किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान व अभिषेक घालतात आणि त्यानंतर त्यांना फुले अक्षता वाहतात आणि त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवतात.

त्याचबरोबर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांना मानपासून केलेली भक्ती खुप आवडते, त्याना कुठलेही अतेरिकी पणा अडवत नाही तसेच, जो सेवक सेवा करतो स्वामींची त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये, असे स्वामी आपल्या सेवकरी ला व भक्तांना सांगतात. त्याचप्रमाणे इतर व्यक्तींना किंवा समाजाला दाखवण्यासाठी सेवा करु नये. स्वामींची भक्ती करताना मनापसून करावी तसेच एखादी गोष्ट मिळावी या उद्देशाने किंवा लोभाने स्वामींची सेवा करू नये.

मित्रांनो विविध गोष्टी आणि वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजां आवडत असतात. त्यापैकीच एका प्रभावी गोष्टी बद्दल आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून आहोत. हि वस्तू हि तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी, पैसा विविध मार्गानी तुमच्या येण्यास सुरवात होइल. स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सत्ता तुमच्या जवळ ठेवत चाल यामुळे तुमच्या मनात कधीच नकारत्मक गोष्टी येणार नाही.

आज जी वस्तू आम्ही तुम्हला सांगणार आहोत, ती वस्तू आपल्याला धार्मिक स्थळांवर किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये सहज उपलबध होते, ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते, त्याचबरोबर स्वामींच्या केंद्रात हि तुम्हाला ही वस्तू मिळून जाईल. त्याचबरोबर ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेऊन द्या. यामुळे तुमच्यावर आलेल्या सर्व संकटांपासून सुटका होईल आणि तसेच तुमच्या नौकरी, धंदा यामध्ये येणारी अडचण कमी होईल आणि त्याचबरोबर तुमच्या पैशा संबंधित असणाऱ्या सर्व अडचणी पासून तुमची सुटका होईल.

मित्रांनो स्वामींची आवडती ती वस्तू आहे “रुद्राक्ष”. हे रुद्राक्ष कितीही मुखी असला तरी चालेल, तसेच तुम्ही रुद्राक्ष ची माळ घेतली तरी चालेल, ती माळ घेऊन जर स्वामींचा जप करण्यासाठी वापरली , किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी वापरणार असाल तरीही चालेल परंतु तिची स्थापना करणे आधी किंवा तिचा जप करण्यासाठी उपयोग करण्या आधी त्याची पूजा करून ते देवगरात ठेवावे. त्याचबरोबर एखादा रुद्राक्ष देखील तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये परिधान करू शकता.

अशी ही स्वामींची आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर यामुळे तुमच्या घरातील धना संपत्तीत वाढ होईल आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ आणि लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहील यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून तुमची सुटका होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.