नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणींना शिव पुराणांमध्ये असे लिहिलेले आहे की महादेवांना अर्पण केलेल्या वस्तू जसे की फुल, फळे, वस्त्र प्रसाद, दान या वस्तू महादेवांना अर्पण केल्यानंतर त्या वस्तूंवर कोणत्याही संसारीक व्यक्तीचा अधिकार नसतो. प्रसाद म्हणून महादेवांना अर्पण केलेल्या वस्तू आपण ग्रहण करू शकत नाही. कारण एखादी कोणतीही वस्तू आपण जर महादेवांना अर्पण केलं तर त्या वस्तूवर फक्त आणि फक्त गणांचा अधिकार असतो. संसारीक मनुष्याचा अधिकार त्याच्यावर नसतो. व त्याला ती ग्रहण करण्याचे अधिकार देखील नसतात शिवपुराण कोणता हे संसारिक ब्राह्मण करू शकत नाही. त्याचबरोबर शिव पुराण यांची कथा कोणताही ब्राम्हण सांगत नाही.
त्याचे खरे कारण म्हणजे शिवपुराण सांगत असताना जी काही दान, दक्षिणा, फळे जे काही दान स्वरूपात अर्पण केलेली असते ते सर्व वृद्धाश्रम गोशाळा ते इतर कोणत्यातरी धार्मिक कार्यामध्ये वापरावे लागते. ते स्वतःसाठी वापरण्यात येत नाही त्यामुळे कोणताही ब्राह्मण शिवपुरान सांगत नाही.
महादेवांच्या नावाने जमा झालेली दान, दक्षिणा ही स्वतःसाठी कधीही खर्च करता येत नाही. भगवंतावर, रामायणावर, भागवतावर जमा झालेली दान दक्षिणा ब्राह्मण स्वतःसाठी वापरू शकतात. मात्र शिवपुराण शिवचरित्रावर आलेली दान दक्षिणा हे ब्राह्मण घेऊ शकत नाहीत. कारण त्यावर त्यांचा अधिकारच नसतो. काही ठिकाणी महादेवांचा अभिषेक केला जातो. भरपूर दुधा दह्याने महादेवाचा अभिषेक केला जातो.
आणि तेच पंचामृत स्वरूपात प्रसाद म्हणून इतरांना दिला जातो. व ठराविक लोक ते एक-एक ग्लासभर देखील घेतात. त्यावर आपला काडीचाही अधिकार नसतो. त्यामुळे हे प्रसाद म्हणून खाणे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या वेळी एखादे फळ किंवा वस्तू आपण महादेवांना अर्पण केली की झाले त्यावर आपला अधिकार काहीही नसतो. त्यामुळे ते पुन्हा आपण प्रसाद म्हणून घेऊ शकत नाही. नाहीतर त्याचे दोष आपल्याला लागतात. व याचे वाईट परिणाम देखील आपल्या आयुष्यावर होऊ शकतात. जे काही आपण भगवान शंकरांना अर्पण केले आहे त्यावर फक्त शिवगणांचा अधिकार असतो. त्यामुळे भगवान शंकराच्या मंदिरा मध्ये गेल्यानंतर भगवान शंकरांना किंवा पिंडीवर अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तू किंवा प्रसाद स्वतः ग्रहण कधीही करू नये हे खूप अशुभ असते.संसारिक मनुष्य त्यातील फळ हेदेखील ग्रहण करू शकत नाही. मग ते कोणीही असो जे लोक संसारातून संन्यास घेतलेले आहेत.
संसारातून मुक्त झाले आहेत जे मोहमाया घरदार यातून आपली सुटका करून घेतली आहे त्यातून जे लोक मुक्त झाले आहेत. जे कोणाच्याही ममतेत अडकलेले नाहीत. अशाच व्यक्ती महादेवांना अर्पण केलेल्या वस्तू घेऊ शकतात व त्यांचा प्रसाद ग्रहण करू शकतात. कारण भोलेनाथ हे संसारात राहून विरक्त आहेत.ते स्मशानात भुता प्रेतं सोबत राहतात संसार आणि देव यामध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे जे लोक या संसारातून मुक्त आहेत किंवा आहेत. त्याच व्यक्ती या वस्तू किंवा प्रसाद ग्रहण करू शकतात. जर शिव गणान व्यतिरिक्त महादेवांना अर्पण केलेल्या वस्तू दुसऱ्याने घेतल्या तर त्याचे पाप व्यक्तींना लागते. त्यामुळे महादेवाच्या मंदिरा मध्ये गेल्यानंतर शिवलिंगावर अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तू किंवा प्रसाद चुकूनही ग्रहण करू नये, नाहीतर आपण पापात पडू शकता.
मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांची आधार एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.