स्वामींचे कुंकवाचे पाऊल उमटले: श्री स्वामी समर्थ अनुभव आणि प्रचिती

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो स्वामींचे कुंकवाचे पाऊल उमटले हा अनुभव आणि आलेली प्रचिती या बद्दलची माहिती आज आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. हा अनुभव सौ. सुधाताई जोशी व श्री गोविंद जोशी यांचा आहे. सौ व श्री जोशी 1940 पासून ते श्री स्वामी समर्थ महाराज यांचे सेवेकरी आहेत. या लेखातील हा अनुभव सन 2006 सालचा सांगण्यात आला आहे.

सौ व श्री जोशी यांनी अत्यंत मनोभावाने स्वामी समर्थ महाराजांची साठ ते सत्तर वर्ष सेवा केली होती. काकूंचे वय 85 तर काकांचे वय 90 पर्यंत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा वरदहस्त त्यांच्यावर कायम आहे त्यांना अनेक संकटातून महाराजांनी सुटका करून दिली आहे.

प्रत्येक संकटातून स्वामिनी सुखरूपपणे त्यांना बाहेर काढले आहे. मुलांची लग्न होऊन त्यांना मुलेबाळे झालेले आहेत ते त्यांच्या घरामध्ये सुखी-समाधानी आहेत व पुढे देखील असेच सुखासमाधानाने कायमच ठेवावे हीच इच्छा आहे.

जोशी काका स्टेट बँकेमध्ये नोकरीला होते 1940 मध्ये त्यांची बदली अक्कलकोटला झाली होती. त्यामुळे स्वामी सेवेचा त्यांना जणू काही लळाच लागला होता नोकरीच्या बदल्यात त्यांना पगार स्वरूपात मोबदला मिळत होता.त्या पगारातच त्यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते त्यामध्ये त्यांना सुद्धा काकूंची ही चांगलीच मदत होत होती. चांगली स्थळे मिळाली व मुलींची लग्नही झाली.

काकांची वारंवार बदली होत होती त्याच वेळी दुसरे महायुद्ध सुरू होते त्यामुळे काका नोकरीसाठी सकाळी सातला निघाली की रात्रीचे दोन तीन वाजता घरी पोहोचायचे त्यामुळे काका घरी कमी असायच.स्वामी समर्थ महाराज यांनी मुलींच्या लग्नाच्या वेळी मदत केली स्वामींच्या कृपेमुळेच पहिले स्थळ आले की ते स्थळ कसं व्हायचे व अशा पद्धतीने त्या चारही मुलींची लग्न झाली.

जोशी काका 1976 रोजी निवृत्त झाले व त्यांनी स्वामी सेवेकडे जास्त लक्ष दिले काकांनी महिन्याला एक असे गुरुचरित्राचे पारायण केले.काका- काकू मित्र सेवेमध्ये असल्यामुळे आपल्या संसारात येणाऱ्या अडचणी ते महाराजांना सांगत असत.स्वामी समर्थ महाराज आपल्याला सर्व अडचणीतून दूर करतील हा विश्वास त्यांचा होता. व आपण जो श्वास घेत आहोत तो स्वामी आज्ञेनुसार घेत आहोत असा त्यांचा दृढनिश्चय झाला होता.

काका काकू 1976 पासून पंढरपूरची वारी करत होते. त्याचप्रमाणे 1980 ला पंढरपूरला जाण्याचे ठरत होते. त्या वेळी शेजारच्या बायका येऊन म्हणाल्या की तुम्ही जर पंढरपूरला कसे जाणार? तुम्हाला काहीही त्रास वगैरे झाला तर कसे सोसणार? काकूंचा स्वामी महाराजांवर विश्वास होता म्हणून काकू महाराजांच्या फोटो समोर बसून महाराजांना सांगत होत्या. की आम्ही पंढरपूरला देव दर्शनाला जात आहोत फिरायला वगैरे जात नाही त्यामुळे येणाऱ्या अडचणी ह्या सर्व तुमचं तुम्ही पाहून घ्या.

स्वामी महाराजांबरोबर बोलत बोलतच काकूंचा डोळा लागला. व काकू तेथे झोपी गेल्या काका आतल्या खोलीत आवराआवर करत होते. साडेआठच्या सुमारास काका जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी जे दृश्य पाहिले त्याच्यावर त्यांचा विश्‍वासच बसला नाही.

त्यांनी काकूंना उठवून झालेला सर्व प्रकार सांगितला काकू ज्या ठिकाणी उशीवर झोपल्या होत्या त्या उशी वरच सुमारे अर्धा फूट जाड व एक फूट लांब असे कुंकूवाचे पाय उठले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांची होते.हा प्रकार बुधवार दिनांक 2 जुलै 1980 रोजी रात्री साडेआठ व पंढरपूर दर्शनासाठी जावे म्हणून स्वामी समर्थ महाराज यांनी हिरवा कंदील दाखवला होता.

भाऊ सागर सोसायटीमध्ये काकांचा स्वामी कृपा नावाचा बंगला आहे काका व काकू यांना प्रसिद्धी ची आवड नव्हती पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुळे त्यांची प्रसिद्धी वाढली व पुण्या-मुंबईहून लोक तेथे दर्शनाला येऊ लागले.
दर्शनाला आलेल्या लोकांनी काही पैसे ठेवण्यास सुरुवात केल्या त्या पैशाचा पैशांचा काकू वापर केला नाही ते पैसे तसेच केंद्रात जाऊन देत होते.

वृद्धापकाळामुळे ते जावई व लेक यांच्या आग्रहाखातर त्यांच्याकडे राहण्यास गेल्या आहेत. अजूनही स्वामी समर्थ महाराजांच्या त्या पावलांची दर्शन घेण्यासाठी लांबलांबून लोक येतात.
मित्रांनो स्वामी समर्थ महाराज बद्दल आलेले अनुभव आणि प्रचिती आम्ही या सदराद्वारे प्रसिद्ध करत असतो. यातील लेख हे मिळत असलेल्या विविध स्त्रोतांच्या आधारे तसेच काही मंडळींनी कमेंट बॉक्सदारे सुचविलेल्या अनुभवानुसार निवडक अनुभव आम्ही येथे प्रसिद्ध करीत आहोत. आपणही आम्हाला कमेंट बॉक्स द्वारा कळवू शकता.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर कराय विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *