फक्त एक शनिवार करा ‘हा’ उपाय, शनिदेव प्रसन्न होतील : शनि मुक्त होऊन यशस्वी बनाल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात आठवड्याचे सात दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केले जातात. ज्याप्रमाणे सोमवार हा शिवाला समर्पित आहे, मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे, बुधवारी गणेशाला समर्पित आहे, त्याचप्रमाणे शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला न्यायाचा देवता म्हणतात. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार असे म्हटले जाते की आपल्या कर्मानुसार केवळ शनिदेवच चांगले आणि वाईट फळ देतात. शनिदेवाचे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये वाईट कर्म केलेले नसेल तर शनिदेवतेला घाबरण्याची काहीही गरज नाही.

त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव आपल्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ देतात. म्हणूनच आपल्या जीवनात वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो आणि त्याचबरोबर अशा व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी दोष निर्माण होत असतो.

परंतु मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या वाईट कर्मामुळे जर त्याच्यावर शनिदेवांचा प्रकोप झाला असेल आणि त्याच्यावर शनी देवता नाराज झाले असतील आणि म्हणून त्या व्यक्तीला जीवनामध्ये सामना करावा लागत असेल. तर अशा वेळी त्या व्यक्तीला शनी देवतेला प्रसन्न करणे गरजेचे असते त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो.

म्हणूनच मित्रांनो आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की शनिवारी काही विशेष उपाय केल्यास केवळ शनिदेवाची कृपाच होत नाही तर सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होतो आणि आपल्यावर असलेला शनी दोष आहे कमी होण्यास मदत होत असते. चला तर मग जाणून घेऊया शनिवारी कोणते उपाय आपल्याला आपल्यावरील शनि दोष कमी करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील संकटांपासून सुटका मिळवण्यासाठी करायचे आहेत ते.

शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी बजरंगबलीला शनिवारी सिंदूर आणि चमेली अर्पण करावी, अशी धार्मिक मान्यता आहे. एवढेच नाही तर या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनिदेवाचा कोप टाळता येतो. इतकंच नाही तर हनुमानजींची पूजा करणाऱ्यांना शनिदेवाच्या छळाचा सामना करावा लागत नाही असं म्हटलं जातं. मित्रांनो आपल्यावर झालेला शनीदोष कमी करण्यासाठी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी नियमितपणे पिंपळावर जल अर्पण करून त्याची पूजा करावी.

त्याचबरोबर पूजा केल्यानंतर पिंपळाच्या झाडाची सात वेळा प्रदक्षिणा करा. यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात यासोबतच या दिवशी गरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व अडचणी बसून आपली सुटका करतात.

त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे मानले जाते की दर शनिवारी शनि मंदिरात शनिदेवाला तेल आणि काळे तीळ अर्पण करावेत. याशिवाय तेल दान करणेही उत्तम असल्याचे सांगितले जाते. यासाठी प्रथम आंघोळ केल्यानंतर तेलाच्या भांड्यात आपला चेहरा पहा आणि नंतर ते तेल कोणत्याही गरजूला दान करा. त्याचबरोबर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी विधिवत पूजा करावी, असे शास्त्रात लिहिले आहे. तसेच निळी फुले अर्पण करा. असे म्हणतात की शनिदेवाची पूजा करताना त्यांची मूर्ती प्रत्यक्ष पाहू नये.

असे म्हणतात की शनिवारी सूर्यास्तानंतर निर्जन ठिकाणी असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. जवळ पिंपळाचे झाड नसेल तर मंदिरातही दिवा लावावा. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.