गणेश जयंतीला करा ‘हा’ उपाय : सर्व विघ्ने नष्ट होतील, संकटे दूर होतील

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्या पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला आणि ज्यावेळी गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते.

गणेश जयंतीला अनेक लोकं हळद किंवा शेंदुरी गणपतीची प्रतिमा तयार करून त्याची पूजा करतात. तिळाने तयार पदार्थ गणपतीला अर्पित करतात म्हणून याला तिल कुंद चतुर्थी असे ही म्हटले जातं. या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी तिल मिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळाचे उटणे लावावे.माघ महिन्यातील माघी गणेश जयंतीला गणपतीची आराधना केल्याने सर्व संकट दूर होतात, मानसिक विकार दूर होतात, या जन्मी सर्व मनोकामना पूर्ण होऊन मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.

या दिवशी चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावे. गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेयसह पूर्ण शिव कुटुंबाची पूजा विधिपूर्वक करावी.
गणपतीला लाल फुलं चढवावे त्यानंतर गणपतीला तूप आणि गूळ याचे नैवेद्य दाखवावे. या उपायांबरोबरच गणपतीला १०८ दूर्वांवर पिवळी हळद लावून अर्पित कराव्या आणि यासोबतच हळदीच्या पाठ गाठी चढवाव्या. यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी करू शकता.

कोणताही एक उपाय करून झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीष पाठ करून गणपतीला मोदक, गूळ, फळ, मिठाई, तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. प्रसाद भक्तांमध्ये वाटावा.

त्याचबरोबर या दिवशी सकाळी अंघोळ करून झाल्यानंतर गणेशाला मोजून पाच दुर्वा अर्पण कराव्या त्यामुळे गणेश प्रसन्न होतो. दुर्वा गणेशाच्या पायावर नाही तर त्यांच्या मस्तकावर ठेवावा. दुर्वा ठेवल्यावर ओम गं गणपतये नमः हा मंत्राचा जम करावा. यामुळे श्री गणेश आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्यावर आलेल्या सर्व अडचणींपासून आपली सुटका करतील, मित्रांनो गणेशाची पूजा करताना तूपाचं मोठं महत्त्व असते, गणपती बाप्पांना तूप खूप आवडते.आपल्या शास्त्रांमध्ये असंही सांगितलं आहे की, जो व्यक्ति गणेशाला तूप वाहतो त्याची बुद्धी चांगली होते. यामुळे मनुष्याची योग्यता आणि ज्ञान दोन्ही वाढते.

गणपती बाप्पाल प्रसन्न करण्यासाठी त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक हे बाप्पाचे सर्वांत पसंतीचे खाद्य आहे. जे भक्त गणपती बाप्पाला मोदक अर्पण करतात, गणपती बाप्पा त्यांची मनोकामना नक्की पूर्ण करतात आणि त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण हि करत असतात. मित्रांनो हे उपाय आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी करायचे आहेत परंतु आता आपण वास्तुशास्त्र मध्ये गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी ची एक महत्त्वाच्या वस्तू बद्दल माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो गणपती बाप्पाला लवकरात लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी आपण गणेश यंत्राचा ही वापर करू शकतो, आपल्या यंत्र शास्त्रानुसार गणेश यंत्र हे खुप चमत्कारी यंत्र आहे. चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये याची स्थापना करावी. चतुर्थीच्या दिवशी या यंत्राची स्थापना व पुजा केल्याने अनेक लाभ होण्यास मदत होते. हे यंत्र घरात ठेवल्याने वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *