नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्यातील बऱ्याच स्त्रिया आपल्या पतीला त्यांच्या कामामध्ये यश मिळावे आणि त्याचबरोबर आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी देवी देवतांकडे प्रार्थना करत असतात आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्राची मदत घेऊन आपल्या घरांमध्ये वेगवेगळे उपाय देखील करत असतात. मित्रांनो आज आपण वास्तुशास्त्र मधील असाच एका प्रभावी उपाय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हा उपाय जर घरातील विवाहित स्त्रियांनी केला तर यामुळे त्यांच्या पतीची प्रगती होईल आणि त्याच बरोबर त्यांच्या पतीला त्याच्या कामामध्ये व्यवसायामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल.
मित्रांनो हा उपाय आपण घरातल्या घरात अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये करू शकतो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त पूजेची एक सुपारी लागणार आहे. ही सुपारी आपल्याला कोणत्याही पूजेचा दुकानात किंवा अगदी किराणा मालाच्या दुकानात सुद्धा सहज उपलब्ध होईल. परंतु मित्रांनो
हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीनच सुपारी आणायचे आहे. घरातील कोणतीही जुनी सुपारी आपल्याला हा उपाय करत असताना वापरायची नाही.
ही सुपारी बाजारातून आणल्यानंतर कोणत्याही वेळी आपण देवघरात ठेवू शकता. या सुपारीवर हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी त्याचबरोबर त्या सुपारीची दिव्याने ओवाळणी सुद्धा करायची आहे,या सुपारीला ओवाळत असताना आपल्याला एका प्रभावी मंत्र म्हणायच आहे, मित्रांनो आपल्याला या सुपारीला पाहून जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे “ओम नमो भगवते वासुदेवाय”. मित्रांनो हा मंत्र तुम्हाला २१ वेळा म्हणायचा आहे.
या मंत्राचा आपल्याला २१ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर एका पांढर्या शुभ्र कपड्यांमध्ये ही सुपारी बांधायची आहे त्यानंतर ही सुपारी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या किंवा उजव्या बाजूला वर लावायची आहे, परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की ही सुपारी आपल्याला घराच्या आतील बाजूने लावायची आहे ,असे केल्याने आपल्या घरातील सदस्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होऊन लागेलआणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल.
मित्रांनो अशा पद्धतीने घरातील विवाहित स्त्रियांनी जर हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर यामुळे त्या महिलेच्या पतीला त्याच्या कामामध्ये यश मिळेल आणि त्याच बरोबर त्याची व्यवसाय मध्ये किंवा नोकरी मध्ये प्रगतीही होण्यास सुरुवात होईल आणि घरामध्ये पैसा येऊ लागेल , धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होऊ
लागतील परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की हा उपाय फक्त घरातील महिलांनीच करायचा आहे. अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा व सर्व सिद्धी प्रदान करणारा असा महत्त्वाचा उपाय आहे.