4 फेब्रुवारी गणेश जयंती : गणेशाला अर्पण करा ‘या’ वस्तू : मागाल त्या इच्छा पूर्ण होतील !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो गणेश जयंती तसेच संकष्ट चतुर्थी व्रत या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते. उपवास ठेवला जातो. श्री गणेश ही बुद्धीची व विद्येची देवता, गणांचे अधिपती, चौदा विद्या, चौसष्ट कलांची स्वामी मानले जाते.

मित्रांनो जो कोणी हे गणेश जयंती किंवा संकष्टी चतुर्थी व्रत श्रद्धा व भक्तीने करतो श्री गणेश पूजन करतो त्यावर श्रीगणेश कृपेने कसलेही संकट येत नाही. सर्व बाधा दूर होतात तसेच होते मनुष्य सुखाची प्राप्ती करतो. श्रीगणेशाची कृपा आशीर्वाद सोबत सदैव राहतात.

मित्रांनो आज आपण या गणेश जयंती व संकष्ट चतुर्थीचे व्रत महत्त्व तसेच पूजाविधी चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे मंत्र जप कोणता करावा. तसेच श्रीगणेशांना प्रसन्न करणारा एक विशेष उपाय तसेच विशेष सामग्री कोणती अर्पण करावी ज्यामुळे श्रीगणेशाची कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन मनुष्य सर्व संकट दुःख बाधा यातून मुक्त होईल.

मित्रांनो असे मानले जाते की जो कोणी खऱ्या भक्तीने व श्रद्धेने हे व्रत करतो त्याच्या समस्त इच्छा श्रीगणेश कृपेने पुरती जातात. त्याचे समस्त विघ्न गणेश कृपेने दूर होतात.
हे व्रत करण्यासाठी आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपली स्नान आदी नित्य कर्म करून सूर्योदय झाल्यानंतर सर्वप्रथम सूर्यनारायणाला अर्ध्य द्यायच आहे. जल अर्पण करायचा आहे.

तसेच आजच्या या व्रताचा संकल्प करायचा आहे व व्रत करायचा आहे तसेच पूजा शुद्ध व पवित्र होऊन श्री गणेशाची मूर्ती स्थापित करावी. कलश स्थापना करावा दिवा लावायचा आहे.

सर्वप्रथम श्रीगणेशाचे पंचामृताने स्नान घालावे. स्नान घालताना ओम गं गणपतये नमः असा जप करायचा आहे. पंचामृताने स्नान घालून झाल्यावर आणि शुद्ध जलाने पुन्हा स्नान घालायचा आहे व त्यांना त्यांच्या जागी पुन्हा स्थापित करायचं आहे.

त्यानंतर आपण कलश पूजन करून घ्यायचे आहे दीप पूजन करून घ्यायचा आहे. तसेच श्री गणेशाची पंचोपचार पूजा करायचा आहे.त्यांना त्यांच्या पूजनांमध्ये त्यांना लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे. तसेच त्यांना जानवे अर्पण करायच आहे. त्यांना त्यांची आवडती दुर्वा नक्की अर्पण करायची आहे. नंतर नैवेद्य अर्पण करायचा आहे.

नैवेद्यामध्ये आपण त्यांना मोदक अर्पण करू शकतो किंवा त्यांना लाडू देखील अर्पण करू शकता. त्यानंतर त्याची आरती करायची आहे. मनोभावे प्रार्थना करून आपली इच्छा प्रकट करायचे आहे. त्याप्रमाणे आपण पूजाविधी करायची आहे.

तसेच आपण दिवसभरामध्ये किंवा पूजा स्थळी बसून ओम गं गणपतये नमः या नामाचा जप एक कमीत कमी दिवसभरामध्ये 108 वेळेस तरी आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्याला करायचा आहे.

त्याचप्रमाणे गणेश जयंती शिवाय संकष्टीला आपण सायंकाळी देखील श्रीगणेशाचे विधिवत पूजन करायचा आहे व चंद्रोदयाची वेळेस आपल्याला चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राचे विधिवत पूजन करायचा आहे.

चंद्राला दुध व गंगाजल टाकून चंद्र देवाला अर्ध्य द्यायच आहे. तीन वेळेस अर्ध्य देताना ओम सोम सोमायन नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर हे व्रतं सोडायचा आहे.

या दिवशी श्री गणेशा निमित्त श्री गणेशाला प्रसन्न करणारे विशेष उपाय केले त्यांना विशेष सामग्री अर्पण केल्यास शीघ्र फळाची प्राप्ति होते तसेच मनाची इच्छा पूर्ती जातात.

या विशेष उपाय असे त्यांना कोणतीही सामग्री यादीची आपण पण करायची आहे तुम्ही श्रीगणेशाचे पूजन करणार त्या वेळी त्यांना तुम्ही हळकुंड त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे. आपण त्या हळकुंडाला पिवळा धागा बांधायचा आहे व ते श्री गणेशाच्या चरणी अर्पण करायचे आहे.

त्यामुळे मानले जाते की माणसाच्या जीवनातील धनहानी कमी होते तसेच नोकरी संबंधित अडचणी आहेत त्या दूर होतात. तसेच घरामधील अनुभवता आहे तीदेखील दूर होण्यास मदत होते.

तसेच पूजा झाल्यानंतर हळकुंड आपण आपल्या पैसे ठेवण्यासाठी ठिकाणी किंवा आपल्या मौल्यवान वस्तू ठेवतो तेथे आपण ठेऊ शकता. आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी आपल्या डेस्क मध्ये देखील ठेवू शकता. पण ते ठेवणे गरजेचे आहे.

तसेच श्री गणेशाची पूजा करत असतांना त्यांन शमीचे पान अर्पण करू शकता. त्यामुळे मानले जाते की शमीचे पान अर्पण केल्याने पैशाची कमतरता राहत नाही. सुख शांती व समृद्धी घरामध्ये येते.

तसेच आपण हळकुंडाची माळ श्री गणेश यांना अर्पण करू शकता तसेच श्री गणेश यांना पाच लवंग-इलायची देखील अर्पण करू शकता. त्यामुळे मानले जाते की श्रीगणेश कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होऊन तुमच्या धर्म विषयक समस्या दूर होतात.

तसेच त्यांना दुर्वांची माळ या दिवशी अर्पण करू शकता. त्यांनी ही श्रीगणेश प्रसन्न होतात अशा प्रकारे या दिवशी आपण श्रीगणेशांना पूर्ण दिवस त्यांच्या साठी समर्पित करायचा आहे. त्यांच्या नामामध्ये त्यांच्या नाम जपा मध्ये दंग रहायचं श्रद्धापूर्वक त्याची भक्ती करायची आहे.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *