नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांची कृपा आपल्यावर राहावे यासाठी गुरूवारच्या दिवशी स्वामींची पूजा करत असतात यामध्ये हे लोक सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जातात आणि आपली देवघरातील दररोजची पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात यामध्ये प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेला किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान व अभिषेक घालतात आणि त्यानंतर त्यांना फुले अक्षता वाहतात आणि त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवतात.
मित्रांनो आपल्या शास्त्रामधील स्वामींची पूजा करत असताना काही गोष्टींबद्दल माहिती व नियम आपल्याला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण स्वामींची पूजा करत असताना कोण कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच बरोबर स्वामींची पूजा करत असताना आपण ज्या चुका करतो त्याबद्दल सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामी समर्थांची पूजा किंवा स्वामींच्या कोणत्याही मंत्राचा जप करत असतो तेव्हा त्यावेळी आपल्या बाजूला आपल्याला या दोन गोष्टी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
मित्रांनो यातील सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अगरबत्ती ज्यावेळी आपण स्वामींची पूजा करत असतो किंवा स्वामींच्या मंत्राचा जप करत असतो किंवा गुरुचरित्र पारायण यातील एखादा अध्याय वाचत असतो त्यावेळी आपल्याला स्वामींच्या प्रतिमेसमोर एखादी तरी अगरबत्ती लावली पाहिजे, मित्रांनो स्वामींची कोणतीही सेवा करत असताना आपल्याला सर्वात आधी अगरबत्ती लावणे गरजेचे असते. मित्रांनो जर तुम्हाला अगरबत्ती लावणे शक्य नसेल तर तुम्ही त्याच्या जागी धूप किंवा उध ही लावू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या तीन पैकी कोणतीही गोष्ट लावणे शक्य नसेल तर तुम्ही एखादा दिवा तरी लावू शकता.
त्यानंतर ची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास.मित्रांनो जाही वेळी तुम्ही स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करतात किंवा स्वामी समर्थांची सेवा करत असतात तेव्हा तुम्हाला अगरबत्ती सोबतच किमान एक ग्लास पाणी तरी सोबत घेणे आवश्यक असते. उधबत्ती व पाण्याने भरलेला ग्लास सोबत घेऊनच स्वामी समर्थांची सेवा करायचे आहे मग ती सेवा एखादा जप करणे किंवा गुरुचरित्र पारायण यातील एखादा अध्यायाचे वाचन करणे किंवा सकाळच्या वेळी आपण जी स्वामी समर्थांची विशेष पूजा करतो ती असो यापैकी कोणतीही सेवा करत असताना आपल्याला या दोन गोष्टी आपल्यासोबत ठेवायच्या आहेत.
त्यानंतर जेव्हा तुमची सेवा पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला तुम्ही लावलेल्या उदबत्ती मधून जी उधी किंवा राख खाली पडेल ती आपल्याला आपल्या कपाळावर लावायची आहेआणि त्याचबरोबर घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर ही उधि तुम्हाला लावायची आहे,जे पाणी आपण ग्लास मध्ये किंवा तांब्या मध्ये सेवा करत असताना घेतले होते ते पाणी आपल्याला घरातील सर्व सदस्यांना तीर्थ व प्रसाद म्हणून थोडे थोडे हातावर द्यायचे आहे. मित्रांनो ह्या दोन कृती जर आपण दररोज स्वामी समर्थांची सेवा करत असताना केली तर त्यामुळे आपण जी
काही सेवा केली आहे त्याचे फळ तुम्हाला मिळते.