नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो तुमचा एखादा महत्त्वाचं काम जर पूर्ण होत नसेल त्या कामांमध्ये खूप सार्या अडचणी येत असतील, बाधा येत असतील, अडथळे येत असतील आणि हे काम काही केल्या पूर्ण होत नसेल तुम्ही आटोकाट प्रयत्न करत आहात मात्र त्या कामामध्ये यश मिळत नसेल तर मित्रांनो अशा मोठ्या आणि महत्त्वाच्या कामात यश मिळण्यासाठी आपण आजचा हा छोटासा उपाय अवश्य करून पहा.
मित्रांनो हा उपाय गणपती बाप्पांना प्रसन्न करणार आहे. गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठीच आपण हा छोटासा उपाय करत आहोत. हा उपाय केल्याने गणपती बाप्पा आपल्या कामात आपल्याला यश प्रदान करतात.
मित्रांनो देवांमध्ये प्रथमेश आहेत. गणपती बाप्पा आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहेत. तुमचं कोणतही काम असुद्यात या कामांमध्ये हमखास यश प्राप्ती या उपायाने नक्की मिळेल. मित्रांनो यासाठी तुम्ही जेव्हा कधी तुमच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडाल तेव्हा गणपतीबाप्पांना 108 दूर्वा अर्पण करण्यास विसरू नका.
गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. या व्हायच्या कशा… 11 दुर्वा आपण गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि दुर्वा अर्पण करताना
श्री गजानन जय गजानन
श्री गजानन जय गजानन
या मंत्राचा जप करायचा आहे. श्री गजानन जय गजानन असं म्हणायचे आणि एक दुवा गणपतीबाप्पांना अर्पण करायची आहे. अशा प्रकारे 108 दुर्वा अर्पण करणार आहोत. म्हणजेच या मंत्राचा 108 वेळा जप आपल्यातून होणार आहे.
त्यानंतर गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून आपण गुळ आणि खोबर अर्पण करायचे आहे. गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीबाप्पांना दाखवायचा आहे.
धूपदीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर ज्या दुर्वा आपण अर्पण केल्या त्या 108 दुर्वा पैकी चार -पाच दुर्वा स्वतःजवळ घ्यायच्या आहेत. या पॉकेटमध्ये ठेऊ शकता, स्वतःच्या खिशात ठेवू शकता. महिला स्वतःच्या पर्समध्ये ठेवू शकता.
स्वतःजवळ त्यातल्या चार-पाच दुर्वा ठेवायच्या आणि त्यानंतर त्या कामास जायचं आहे मित्रांनो जे काम तुम्ही करणार आहात त्या कामात हमखास यश मिळवून देणारा असा हा उपाय आहे
मात्र हा उपाय करताना काही गोष्टींचा पालन अवश्य करा.
पहिली गोष्ट म्हणजे या संपूर्ण दिवसभरात आपल्या तोंडून कुणाचाही अपमान होणार नाही, अपशब्द निघणार नाही. विशेष करून जेष्ठ लोक असतात किंवा महिलांचा अपमान आपल्या तोंडून होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या.
कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका. कोणत्याही पशु प्राण्यांची इजा पोहोचणार नाही वनस्पती नाहीच पोहोचणार नाही याचीही काळजी घ्या.
मित्रांनो जेव्हा कधी आपण असे महत्वाचे काम करत असतो तेव्हा ते उपाय निष्फळ करण्याचं काम आपल्या हातून होणाऱ्या छोट्या छोट्या चुका करत असतात. म्हणून या चुका आपण कटाक्षाने टाळायच्या आहेत.
आपण आहारामध्ये मांसाहार करायचा नाही. कोणत्याही प्रकारचे व्यसन सुद्धा आपण या दिवशी करायचं नाही. सोबतच कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ सुद्धा आपण खायचे नाहीत.
तुमच्या महत्त्वाच्या कामात एकापेक्षा जास्त दिवस लागणार असतील, तर जोपर्यंत तुमचे हे कार्य सिद्ध होत नाही, या कार्याची सिद्धी होत नाही, कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला या नियमांचं पालन काटेकोरपणे करावा लागेल.
तर मित्रांनो गणपती बाप्पांना प्रसन्न करणारा असा हा छोटासा उपाय अवश्य करा तुमच्या कामांमध्ये तुम्हाला नक्की यश लाभेल. माहीती आवडली असेल तर आमच्या पेजला लाईक आणि शेअर करा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्तोत्रांचे आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे त्याचा कुणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.