नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, आपल्या जीवनात बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात कि त्यामुळे आपल्याला काही सुचत नाही आणि कोणता निर्णय घेऊ? कोणता निर्णय चुकीचा आणि कोणता बरोबर हे समजत नाही. त्यावेळेस आपल्याला वाटते आपल्याला मार्गदर्शन करायला कोणीतरी असायला पाहिजे होतं.
आपल्याला समजून सांगणारे कोणीतरी हवं होतं. पण अशावेळी आपल्या सोबत काणीच नसतं. यासाठीच मी तुम्हाला एक सहज साधा उपाय सांगणार आहे.आपल्या जीवनात असे बरेच प्रसंग येतात की योग्य काय.. अयोग्य काय… हे समजत नाही. बऱ्याच वेळेस आपण चुकीचे निर्णय घेतो व त्या निर्णयाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो.
त्यासाठी आपल्याला खूप खूप पश्चाताप करावा लागतो आणि पुन्हा पुन्हा वाटतं की मी हे नाही केल असत तर ते केलं असतं तर. माझ्या मनाला हेच कळलं नाही चांगलं काय ? वाईट काय ? आणि अशा वेळेस अनेक प्रश्न पडतात.
या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कधीच सापडत नाही. मग आता मी असाच एक सहज आणि सोपा उपाय सांगणार आहे. मित्रांनो वारकरी सांप्रदाय किंवा देवाला मानणारे लोक आहेत त्यांना प्रत्येकाला ज्ञानेश्वरी ही आद्य स्थानी किंवा पूज्य स्थानी आहे. या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या दोन ओळी या संकट मोचक आहेत.
या ओळ्या तुम्ही कधी म्हणावयाचा याचं बंधन नाही. फक्त त्यावेळेस तुम्ही शक्यतो शुद्ध मनाने म्हणावे याचा अर्थ तुम्हाला कधीही आशा आहेत.
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥
म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥
याचा अर्थ सांगत बसलो तर भरपूर वेळ लागेल. मात्र थोडक्यात याचा अर्थ एवढाच सांगतो, देवा तूच सर्वेसर्वा आहेस आणि तूच आमच्या समस्या सोडवा आणि तूच आम्हाला योग्य मार्ग दाखव.
त्यात गणपतीची आपण आराधना करतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आराधना करतो. गणपती बाप्पा खूप दयाळू आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा तेव्हा गणपती बाप्पाचा नामस्मरण करा. गणपती बाप्पा तुम्हाला संकटात मार्ग दाखवतील .
मित्रांनो गणपती बाप्पा हे आपल्या सर्व समस्या सोडवतात सर्व अडचणी दूर करतात आणि योग्य मार्ग दाखवतात. मित्रांनो जेव्हा जेव्हा तुम्ही द्विधा मनःस्थितीत असाल अडचणीत असाल समस्या असेल कोणती तर हा मंत्र जरूर मला तुम्हाला गणपती बाप्पा योग्य मार्ग दाखवतील.
तर मित्रांनो आजचा लेख कसा वाटला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि आमच्या पेजला लाईक करा. अशा प्रकारच्या विविध माहितीसाठी आमच्या पेजला सतत भेट देत रहा आणि नवीन माहिती मिळवत राहा.