नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
महादेवाला समर्पित सोमवती अमावस्या दारिद्रय दूर करण्यास मदत करते. मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये या दिवसात संबंधित असा उल्लेख आहे की सोमवार हा चंद्राचा दिवस आहे आणि या दिवशी सूर्य व चंद्र एकाच रेषेत असतात. हा विशेष पर्व विशेष पुण्य फल प्रदान करणारा आहे. मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार सोमवार येणार्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटलं जातं. यासाठी शास्त्रांमध्ये काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत जर हे उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटांपासून आपली सुटका होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरातील धनसंपत्ती द्वारा होईल.
सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जानवे अपिर्त करावं. प्रभू विष्णुच्या नावाचं एक जानवं आणखी पिंपळाला अर्पित करुन प्रार्थना करावी. नंतर 108 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. पिंपळाला गोडाचं नैवेद्य दाखवावं. प्रदक्षिणा घालताना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ मंत्राचा जप करावा. मित्रांनो या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्याला देवी-देवतांना कडे प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून याआधी ज्या काही कळत नकळत चुका झाल्या आहेत त्याबद्दल मला क्षमा करा, मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सर्व देवी-देवतांना कडे तुमच्या हातून झालेल्या चुकांसाठी माफी मागायची आहे.
सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तळावातील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार लाडू खाऊ घालावा, याने पितृ दोष दूर होतो त्याच बरोबर पितृदोष शांतीसाठी अमावस्येच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि सोमवती अमावस्येला पितृ दोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी. त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्रानुसार जर आपण सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्र दान केल्याने पितृ दोष दूर होतो.
मित्रांनो शास्त्रामध्ये या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे, म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करुन दान-पुण्य करावे आणि त्याच बरोबर या दिवशी दान केल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते. मित्रांनो जर या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या घरा समोर असणाऱ्या तुळशी मातेची विशेष पूजा केली आणि तिच्याजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला आणि तुळशी मातेला तीन,सात किंवा अकरा प्रदक्षिणा घातल्या तर यामुळे तुमच्या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होईल आणि घरातील गरिबी ही निघून जाईल.
त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या घरी घरामध्ये पैशा संबंधित वारंवार अडचणी निर्माण होत असतील आणि कमवलेला पैसा इतरत्र कुठेही खर्च होत असेल तो जास्त काळ टिकत नसेल तर या दिवशी जर तुम्ही एक विशेष उपाय केला तर यामुळे तुमच्या घरातील गरिबी नष्ट होण्यास मदत होईल.
म्हणूनच जर जीवनात पैशाची कमतरता असल्यास सोमवती अमावस्येच्या रात्री विहिरीत एक चमचा दूध आणि एक रुपयाचे नाणे टाकल्याने जीवनातील संपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी भगवान शिवाची पूजा विशेष मानली जाते, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, या दिवशी पूर्ण भक्तीभावाने गणेशाला सुपारी अर्पण केल्यास आणि रात्री गणेश मूर्तीसमोर दिवा ठेवल्यास शाश्वत फळ प्राप्त होते.
मित्रांनो हे अमावस्या सोमवारच्या दिवशी आल्यामुळे या दिवशी महादेवाला संबंधित एक छोटासा उपाय जर आपण केला तर आपल्यावर आलेल्या सर्व संकटांपासून आपली मुक्तता होईल यासाठी या दिवशी भगवान शिवलिंगाला कच्चे दूध आणि दही यांचा अभिषेक आपल्याला घालायचा आहे यामुळे भगवान शंकर आपल्याला आशीर्वाद देतात आणि सोमवतीच्या दिवशी असे केल्याने जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि दारिद्र्य दूर होते.