सोमवती अमावस्या दिवशी करा ‘हे’ दोन सोपे उपाय, घरातील वाद, मोठी संकटे दूर होतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो ३१ जानेवारी या दिवशी या नवीन वर्षातील पहिली अमावश्या आली असून या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले आहे. वास्तुशास्त्रानुसार मित्रांनो जर या दिवशी आपण घरामध्ये काही उपाय केले तर यामुळे आपल्या घरातील अनेक मोठमोठी संकटे दूर होऊ शकतात आणि त्याच बरोबर जर घरात वारंवार वाद-विवाद होत असतील तर त्याचे प्रमाणही यामुळे कमी होईल. या अमावस्या च्या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास नदीमध्ये स्नान करायचे आहे आणि स्नान करून झाल्यानंतर दानधर्म ही करायचा आहे कारण या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व दिले गेले आहे.

त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी शास्त्रानुसार मौनव्रत सुद्धा केले जाते आणि जर तुम्हाला मौनव्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही या अमावस्येच्या कालावधीत जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रमंडळी मध्ये, नातेवाईक त्याचप्रमाणे घरातील व्यक्तींमध्ये जास्त बडबड तुम्हाला या दिवसांमध्ये करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी कामा व्यतिरिक्त जास्त बडबड सुद्धा तुम्हाला करायची नाही. या दिवशी तुम्हाला वादविवादही करणे टाळायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा तुम्हाला शक्य करून दाखवायचे असेल तर यासाठी ही एक छोटासा उपाय आपण या दिवशी करू शकतो.

मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक गुळाचा खडा एक चमचा दूध आणि एक चमचाभर मोहरीचे तेल तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे,
अशा प्रकारचे तीन तांबी तुम्हाला तयार करायचे आहेत.
त्यानंतर त्यातील पहिला तांब्या घेऊन आपल्याला ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि शक्य असेल तर पिंपळाच्या झाडा जवळ तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या झाडाकडे क्षमा प्रार्थना करायची आहे.

त्यानंतर दुसऱ्या तांब्या मधील पाणी आपल्याला बेलाच्या झाडाला अर्पण करायचे आहे, हे पाणी त्या झाडाला अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तिसरा तांब्यामधील पाणी तुम्हाला सूर्य नारायणा म्हणजेच सूर्य देवतेला अर्पण करायचा आहे. परंतु मित्रांनो तिसऱ्या तांब्यातील पाणी सूर्यदेवाला आपण करत असताना ते पाणी तुम्हाला जमिनीवर पडू द्यायचे नाही एका बारडी मध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्हाला ते पाणी अर्पण करत असताना एकत्रित करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही झाडाला घालू शकता.

मित्रांनो त्यानंतरचा दुसरा उपाय आहे तो म्हणजे दीप दानचा, मित्रांनो आपल्या सर्वांना दीप दानाचे महत्त्व माहीत आहे. हाऊ काय करत असताना तुम्हाला वडाच्या झाडाचे पाच पाने आपल्या घरामध्ये आणायचे आहेत आणि त्यावर शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, मित्रांनो अशा प्रकारे पाच दिवे आपल्याला त्या वडाच्या झाडाच्या पानांवर ठेवून प्रज्वलित करायचे आहेत आणि नदीमध्ये किंवा समुद्र मध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे दिवे सोडायचे आहेत आणि जोपर्यंत हे दिवे दिसतात तोपर्यंत त्या दिव्याकडे एकटक बघायचं आहे.

हे दिवे सोडत असताना आपल्याला आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा म्हणून त्या दिव्याकडे तुमच्या इच्छा प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. हा बिग पानाचा उपाय जर तुम्ही केलात तर त्यामुळे तुमचे पितृ तुमच्यावर खुश होतील आणि तुमच्यावर असलेली पितृ दोषाची समस्या त्याचबरोबर तुमच्या जीवनामधील मोठ्यात मोठी समस्या देखील दूर होईल. मित्रांनो सोमवती अमावस्याच्या सायंकाळच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *