नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, आपल्यातील बरेचजण घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी आणि सकारात्मक ऊर्जा यावे यासाठी अनेक उपाय करत असतात त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या व्यवसाय मध्ये फायदा व्हावा आणि घरामधील धनसंपत्ती वाढवावी आणि जास्त माने आलेला पैसा जास्त काळ टिकून राहावा यासाठीही दिवस-रात्र मेहनत करत असतात त्याचबरोबर वास्तुशास्त्राची मदत घेऊन घरामध्ये अनेक वेगवेगळे उपाय करत असतात पण हे उपाय चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे अनेक जणांना या उपायांचा फायदा होत नाही.
आज आपण आपल्या देवघरातील एक वस्तू बद्दल माहिती पाहणार आहोत तिच्यामुळे आपण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील धनसंपत्तीची वाढ होईल. मित्रांनो जर आपण देवी-देवतांची मनोभावे पूजाअर्चा आपल्या देवघरात करत असू तर आपल्या देवघरामध्ये देवपूजेसाठी लागणारे साहित्य तेवत असतो त्यामध्ये विशेषता अगरबत्ती आणि कापूर या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतातच. घरामध्ये सकाळ सायंकाळ जर आपण अगरबत्ती लावली तर त्यामुळे आपल्याला व आपल्या घरातील सदस्यांना त्याचे अनेक फायदे होत असतात.
घरामध्ये अगरबत्ती लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते, अगरबत्ती बरोबरच देवघरात जर आपण कापूर,धूप आणि दिवा लावला तर यामुळेही आपल्याला अनेक लाभ होतात. जर आपण अगरबत्ती देवघरात लावली तर आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लावत असतो आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते, जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अगरबत्ती लावतो आणि आणि त्या अगरबत्तीचा वास आणि सुगंध आपल्या घरामध्ये पसरतो आपल्या घरातील नकारात्मकता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते.
याबरोबरच घरामधील वस्तू दोष दूर करण्यासाठी अगरबत्ती चा उपयोग आपण करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार जर आपण दररोज नित्य नियमाने सकाळ-संध्याकाळ घरामध्ये अगरबत्ती लावली तर यामुळे आपल्या घरातील वस्तू दोष दूर होण्यास मदत होते. आपल्या घरात जर वास्तुदोष असेल तर यामुळे आपल्या घरात कायम नकारात्मकता राहते आणि त्यामुळे घरामध्ये कायम वादविवाद होत राहतात आणि आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा संबंधित अडचणी निर्माण होऊ लागतात.
म्हणून जर तुम्ही हे दररोज न चुकता घरामध्ये अगरबत्ती लावली तर या संकटापासून तुम्हाला ही सुटका मिळू शकते. पण घरामध्ये अगरबत्ती लावत असताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर काही नियम हे लक्षात घ्यायचे आहे. आता आपण जाणून घेऊयात या घरगुती नेमकी कोणत्या दिशेला लावावे आणि त्यामुळे त्याचा काय फायदा आपल्याला होईल. वास्तुशास्त्रामध्ये दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली आहे त्यामुळे दक्षिण दिशेला नकारात्मकता जास्त असते म्हणून तुम्ही जर या दिशेला दररोज संध्याकाळच्या वेळेला अगरबत्ती लावली तर घरातील नकारात्मकता लवकर दूर होते.
त्याच बरोबर ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी अपघाती लागत असतो त्याच ठिकाणी आपल्याला दररोज अगरबत्ती लावायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. अगरबत्ती लावण्याचे ठिकाण किंवा जागा आपण जर सारखे बदलत असू तर त्यामुळे आपल्या आपण इच्छिटलेले फळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्याचबरोबर ज्या वेळी आपण अगरबत्ती लावतो त्यावेळी त्यातून निघणाऱ्या धुरामुळे वातावरणात असलेले काही विषाणू सुद्धा नष्ट होतात त्यामुळे आरोग्यासाठीही अगरबत्ती जास्त फायदेशीर आहे.
मित्रांनो जर तुम्हीही आर्थिक समस्यांना तोंड देत असाल तुम्ही तुमच्या घरांमध्ये नकारात्मकता असेल आणि त्यामुळे घरामध्ये वारंवार वादविवाद होत असतील तर तुम्हीही सकाळ-संध्याकाळ देवघरासमोर किंवा तुळशीसमोर किमान एक तरी अगरबत्ती लावलीच पाहिजे.
मित्रांनो हि माहिती अनेक स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला फॉलो करा आणि माहिती शेअर करायला विसरू नका.