सेवा करत असताना मन लागत नाही, इच्छा असूनही सेवा पूर्ण होत नाही, तेव्हा करा ‘हे’ एक काम!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्यातील अनेक जण आपल्या घरात सुख समृद्धी राहावे आणि त्याचबरोबर घरातील संपत्तीत वाढ व्हावी यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात. मेहनत व कष्ट करत असतानाच आपल्या घरातील देवी-देवतांची आणि श्री स्वामी समर्थांची अगदी मनापासून पूजा-अर्चा देखील करत असतात. ही सेवा करत असताना सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून देवघरामध्ये समोर बसून
घरातील देवी-देवतांच्या आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिषेक देखील घालत असतात.

परंतू मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांची अशी समस्या असते की आम्ही ज्यावेळी स्वामींची आणि देवाऱ्यातील देवी देवतांची पूजा व सेवा करत असतो त्यावेळी आमचे लक्ष्य देवपुजेवर व महाराजांच्या सेवेवर लागत नाही, मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात.

आमची खूप इच्छा असते की स्वामी समर्थांची आम्ही दररोज अगदी मनापासून सेवा करावी आणि त्याच बरोबर देवघरातील देवी-देवतांना ही अभिषेक घालून यांचे अगदी मनापासून पूजा करून यांची प्रार्थना आणि एखाद्या मंत्राचा जप करावा. परंतु जेव्हा आम्हीच देवपूजा करायला बसतो तेव्हा आमचे मन देवपूजेमध्ये लागतच नाही.

परंतु मित्रांनो यावर एक उपाय आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो जर देवपूजा करत असताना तुमचे मन लागत नसेल आणि तुमच्या मनामध्ये काही वेगळे विचार येत असतील तर तुम्ही हे एक काम नक्की करा. जर तुम्ही एक काम केले तर तुम्हाला दुसरी कोणतीही सेवा करण्याची गरज सुद्धा भासणार नाही.

मित्रांनो ज्यावेळी आपण देवपूजा करण्यासाठी किंवा स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी बसत असतो आणि आपण मनामध्ये असे ठरवतो की आपण आजही देवपूजा व्यवस्थितरित्या पूर्ण करायची आणि स्वामी समर्थांचा मंत्राचा जप करायचा त्याप्रमाणे त्यांच्या पारायण यातील एखाद्या जरी अध्यायाचे वाचन जरूर करायचे, परंतु अशावेळी जर ही सेवा सुरू करत असताना काही अडथळे येत असतील किंवा मनामध्ये काही नकारात्मक विचार येत असतील तर अशा वेळी तुम्हाला सकाळची, संध्याकाळची किंवा रात्रीची दिवसभरातील कोणतीही एक वेळ ठरवायची आहे.

दिवसभरातील अशी कोणतीही एक वेळ ठरवल्यानंतर त्यावेळी तुम्हाला फक्त स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर बसायचे आहे. स्वामी समर्थांच्या आरती मी समोर बसल्यानंतर करून मला कोणत्याही मंत्राचा जप किंवा अध्यायाचे वाचन करायचे नाही. त्यावेळी तुम्हाला फक्त स्वामी समर्थांच्या समोर शांतपणे बसून राहायचे आहे आणि स्वामी नमस्कार करायचा आहे आणि स्वामींकडे बघतच आपल्याला तिथेच बसून राहायचे आहे, थोड्या वेळानंतर तुम्ही तुमचे डोळे बंद करायचे आहे. डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला स्वामींचे रूप कसे आहे ते आपल्या भक्तांची कशाप्रकारे मदत करत असतात या सर्व गोष्टी आपल्या मनामध्ये आठवायच्या आहेत.

मित्रांनो ही कृती जर तुम्ही केली तर यामुळे तुमचे मन स्वामी समर्थ मध्ये एकाग्र होईल आणि त्यांची सेवा करण्याची तुमची मनापासून इच्छा होईल. अशा प्रकारे तुम्हाला आठ ते दहा दिवस स्वामीं समोर बसून ध्यान करायचे आहे काही दिवसानंतर तुम्हाला याठिकाणी बसल्या नंतरच मंत्राचा जप करण्यास सुरुवात करायचे आहे आणि अशा प्रकारे हळुहळू स्वामी समर्थांच्या सेवेस प्रारंभ करायचा आहे. यामुळे स्वामी समर्थांची सेवा करण्याचे आणि त्यांच्या पारायणाचे वाचन करण्याची इच्छा तुमच्यामध्ये अधिकाधिक निर्माण होत जाईल आणि स्वामी समर्थांची सेवा करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *