‘हे’ वाक्य बोलणे आजच बंद करा नाहीतर तुम्ही कधीच सुखी आणि श्रीमंत होणार नाही

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो आपल्या मनाची शक्ती खूप मोठी असते जे काही आपण सकारात्मक-नकारात्मक बोलतो ते आपल्या अंतर्मनात पर्यंत पोहोचते आणि त्याचीच पुनरावृत्ती होत असते कधीकधी असे होते की आपण काय चांगलं काय वाईट बोलत असतो .त्याचा परिणाम आपल्या अंतर्मनात पर्यंत होत असतो .अंतर मनापर्यंत अशा काही गोष्टी पोचल्यात थोड्या दिवसांनी त्या जशाच्या तशा होण्यास सुरुवात होते.जी वाक्य आपण बोलत असतो. ते आंतर मनापर्यंत पोहोचतं व आपल्या जीवनामध्ये अशाच घटना घडत राहतात. आपण अशा काही गोष्टी बोलतो की त्या आपल्याकडे कमीच आहेत. अशा नकारात्मक बोललेली वाक्य आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पाडतात.

मला पैसा कमी भेटला तरी चालेल पण मला नोकरी मिळायला हवी. आणि त्या मिळालेल्या नोकरीमध्ये मला समाधान मिळायला हवे. हे वाक्य मात्र नकारात्मक वाक्य आहे त्याचबरोबर मी गरीब असलो तरी चालेल. पण सुखी असलो पाहिजे तसेच माझे नशीबच खराब आहे. त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या मनासारख्या होत नाहीत. मी श्रीमंत नाही झालो तरी चालेल पण मात्र मला दोन वेळचे जेवण व्यवस्थित मिळाले पाहिजे. या गोष्टी बोलायला ऐकायला वाचायला छान वाटत असतात. आपल्यापैकी बरेच लोक असे वाक्य देखील बोलत असतील मात्र इथून पुढे या गोष्टी बोलू नका. कारण या गोष्टी सकारात्मक नसून या गोष्टी नकारात्मक आहेत. त्यामुळे याचा परिणाम आपल्या आयुष्यावर याच पद्धतीने होतो.

मग आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो. माझ्या नशिबात काय काय लिहिले आहे. कोणास ठाऊक माझी प्रगती होत नाही माझ्याकडे भरपूर पैसा येत नाही. असे म्हणून आपण आपल्या नशिबाला दोष देऊन रिकामे होतो. माझ्या नशिबात जे आहे. ते मला मिळणारच ते कोणी घेणार नाही. ह्या संकुचित वृत्तीमुळे आपण सकारात्मक विचार करण्याचे सोडून देऊन आहे. त्यात समाधान मानतो त्यामुळे देखील आपली प्रगती होत नाही .नशिबाला दोष देण्यापेक्षा सकारात्मक वाक्य दैनंदिन व्यवहारात वापरण्यास सुरुवात करा. म्हणजे आपले सर्व कामे यशस्वी होतील. आपण नकारात्मक बोलणे सोडून देऊन सकारात्मक बोलण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

मला पगार कमी मिळाला तरी चालेल मी सुखी राहतो आहे .त्यात मी समाधान मानतो अशी वाक्य आपण आपल्या आयुष्यामध्ये म्हणतच असतो. व ते आपल्या अंतर्मनावर विणलेलं असतं त्यामुळे आपल्याला कमी पगाराची नोकरी मिळते व त्या पगारामध्ये आपण समाधानी होतो.जर मित्रांनो आपण असे म्हटलं तर मला भरपूर पगाराची नोकरी मिळणार आहे मला भरपूर सुख मिळणार आहे आणि त्यामध्ये मी सुखी समाधानी होणार आहे. मी खूप श्रीमंत होणार आहे. दोन वेळचे जेवण पोटभर जेवणार आहे. ही वाक्य ऐकायला मित्रांनो छान वाटतात ना त्याप्रमाणेच ह्या वाक्यांमध्ये सकारात्मकता भरलेली आहे.

अशी सकारात्मक वाक्य जर आपण बोलत राहिलो तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. व आपल्याला जे जे हवे आहे. ते आपल्याला मिळणारच यात काय शंका नाही. कारण हे वाक्य सकारात्मक भावनेने भरलेले आहे आम्ही या सकारात्मक भावना आपल्या अंतर्मनाला पर्यंत हे विचार पोहोचवतात या आधी आपण आपल्या वाडवडिलांकडून असे ऐकले असले, की रडत बसू नका. नाहीतर आयुष्यभर आपल्याला रडत बसावे लागेल. त्यामुळे असे नकारात्मक असलेल्या गोष्टी बोलू नका. कारण आपल्या अंतर्मनावर हे नकारात्मक संदेश पोहोचत असतात
आपली सर्व कार्य व विचार सकारात्मक ठेवा म्हणजे त्यामध्ये नक्कीच आपल्याला येईल. व आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होईल.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे .याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *