मुलग्यासाठी कोणत्या राशीची सून शोधावी ?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्र-मैत्रिणींनो तुळशीच्या लग्नापासून पुढे लग्नाचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण आपल्या मुलासाठी मुलगी शोधत असतात. कारण आपल्या भारतीय संस्कृती मध्ये लग्नाला खूप खूप महत्त्व दिलेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार याच्या राशीच्या मुली खूप भाग्यवान मानल्या जातात. या मुली ज्या घरांमध्ये लग्न करून जातात, त्या घरांमध्ये पैसे आणि अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाहीत. या राशीच्या मुली साक्षात लक्ष्मीच अवतार असतात. त्यामुळे आपल्या मुलांच्या लग्नाचा जर आपण विचार करत असाल तर नक्कीच या राशींच्या मुली आपल्या मुलीचं मुलासाठी जोडीदार म्हणून निवड या मुली जर आपल्या घरामध्ये आल्या तर आपल्याला कसल्याही प्रकारचे कमतरता राहणार नाही. व आपल्या मुलाचे देखील कल्याण होईल.

1) कर्क रास- कर्क राशीच्या मुलींना नात्यांची जाण असते. त्यांना प्रत्येक नाती जपण्याची आवड देखील असते व या राशीच्या मुली प्रत्येकाशी प्रेमाने वागत असतात. त्याचबरोबर या राशीच्या मुली एक चांगली जबाबदार सून व पत्नी असल्याचे त्यांच्या वागण्यातून त्या सिद्ध करतात. या मुली संवेदनशील असतात, त्यामुळे यांना कोणालाही त्रास द्यायला आवडत नाही. दुसऱ्यांना सुख समाधान देणे यामध्ये त्या खूप समाधानी असतात. कोणतेही काम त्या जर हातामध्ये घेतल्या तर ते काम त्या पूर्ण करतात. या राशीच्या मुली वक्तशीर व नीटनेटक्या असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक काम नीटनेटके व्हायला पाहिजे असे वाटते व त्यानुसार त्यांची वागणे देखील असते. या राशीच्या मुली समाधानी असल्यामुळे त्यांना व त्यांच्या सासरच्या लोकांना कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे या राशीच्या मुली सासरच्या लोकांसाठी खूपच भाग्यशाली असतात.

2) तुळ रास- या राशीच्या मुली मनमिळाऊ असतात त्यामुळे ज्या ठिकाणी या जातात तेथील वातावरण बदलते या राशीच्या मुली सर्वांशी बोलून चालून असतात. त्यामुळे या राशीच्या मुली ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपले वेगळे अस्तित्व निर्माण करतात व सासरच्या माणसांची काळजी देखील उत्तम प्रकारे घेतात. मात्र या राशीच्या लोकांना कोणत्याही चुकीच्या गोष्टी सहन होत नाहीत हे मात्र तितकेच खरे आहे. या राशीच्या मुली आपल्या कामाशी प्रामाणिक असतात. आपले कोणतेही काम करत असताना आपल्या हातून कसल्याही प्रकारची चूक होणार नाही याची ते काळजी घेत असतात. त्यामुळे त्यांना चुकीच्या कोणत्याही गोष्टी सहन होत नाहीत. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती पतीसाठी व सासरच्या मंडळींसाठी खूपच भाग्यशाली असतात.

3) कुंभ रास- या राशीच्या मुली शांत सहनशील हुशार आणि मेहनती असतात या राशीच्या मुली सासरच्या मंडळींसाठी नवऱ्यासाठी खूप लकी असतात. ज्यावेळी या राशीच्या मुली ज्या घरांमध्ये लग्न होऊन जातात. त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव राहतो या मुली सहनशील असल्यामुळे यांच्यावर कसल्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही, व त्या कोणतेही कार्य करत असताना हुशारीने ते कार्य पार पाडतात. व ते कार्य पूर्णत्वाला नेतात कोणतीही कामे या राशीच्या मुली अर्धवट सोडत नाही. या राशींच्या मुलींमध्ये उत्तम पत्नी व सून होण्याचे सर्वच गुण यांच्याकडे असतात त्यामुळे या सर्वांचे मन जिंकून घेतात. त्यांना आपलेसे करतात त्यामुळे सासरी या राशीच्या मुलींना खूप मान-सन्मान मिळतो.

4) मीन रास- या राशीच्या मुली खूपच भावनाशील असतात जावे की यांना आवडतात त्या व्यक्तींच्या आनंदासाठी या मुली काहीही करतात सासरच्या लोकांसाठी या खूप भाग्यवान मांडल्या जातात. कोणत्याही प्रसंगांमध्ये या मुली आपल्या पतीला एकटे सोडत नाहीत. सुख दुःखा मध्ये सदैव त्यांच्यासोबत असतात. या राशी च्या मुली असल्यामुळे त्या इतरांना कोणालाही दुःख देत नाहीत दुसऱ्याला पुरेपूर आनंद देण्याचा प्रयत्न या सदैव करत असतात. व सासरच्या मंडळींनी जी काही कामे सांगितले आहेत. ती सर्व कामे त्या यशस्वीपणे पूर्ण करतात.

तर वडील सांगितल्याप्रमाणे या आहेत त्या चार राशी या राशीच्या मुलींच्यामध्ये उत्तम सून होण्याचे सर्व गुण असतात मात्र हे सर्व करत असताना आपल्या मुलगा ची रास कोणती आहे. या राशीचे कोणत्या राशी बरोबरचे गुण जुळतात, याचा विचार करूनच लग्न ठरवावे. हे मात्र आपण आपल्या विश्वास असणाऱ्या ज्योतिषाला दाखवूनच निश्चित करावे. सर्व गुण खेळूनच मगच आपल्या मुलाचे लग्न करावे. सांगितल्याप्रमाणे या राशीच्या मुली असतात उत्तम सुनबाई.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *